esakal | पुणे विद्यापीठात करता येणार 'इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर'मध्ये P.G., Diploma
sakal

बोलून बातमी शोधा

Innovation

पुणे विद्यापीठात करता येणार 'इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर'चा अभ्यास

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : उद्योग क्षेत्राची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवसंशोधन व नवोपक्रमातील पदव्युत्तर पदविका (पी.जी.डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम असलेला हा अभ्यासक्रम नवसंशोधन व व्यवसाय सुरू करताना लागणारे व्यवस्थापन कौशल्य याची सांगड घालणारा आहे.

विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्रातर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम अहमदाबाद येथील आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणार आहे. याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘देशात भारतात येत्या काळात ३ हजार नवोपक्रम केंद्र उभारण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी या केंद्रामध्ये काम करण्यास भविष्यात पात्र ठरतील. हा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्याने विद्यार्थी कोणत्याही ठिकाणाहून यासाठी अर्ज करू शकतील’, अशी माहिती केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

हेही वाचा: Maharashtra Unlock : राज्यातील निर्बंध शिथिल होणार?

१) असा आहे अभ्यासक्रम..

 • पदव्युत्तर पदविका प्रकारातील ६ महिन्यांचा अभ्यासक्रम

 • चार विषय आणि १४ श्रेयांक असणारा अभ्यासक्रम

 • प्रामुख्याने इनोव्हेशन मॅनेजमेंट, कस्टमर सेन्ट्रीक इनोव्हेशन अँड प्रोडक्ट मॅनेजमेंट, लीगल अस्पेक्ट्स, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, आय.पी. मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग, मॅनेजिंग न्यू व्हेंचर हे विषय शिकवले जाणार

२) पात्रता आणि निवड

 • विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी अर्ज करू शकतो.

 • आलेल्या अर्जातून मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

 • हा अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन स्वरूपात असेल.

हेही वाचा: Monsoon Session: भाजपकडून राज्यसभेचे नेते पीयुष गोयल; राहुल गांधी लोकसभा नेतेपदी?

अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संकेतस्थळ

https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

 1. अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३० जुलै

 2. निवड यादी जाहीर - ३ ऑगस्ट

 3. प्रत्यक्ष मुलाखत - ४ ते ७ ऑगस्ट

 4. अंतिम निवड यादी १० ऑगस्ट

 5. प्रवेश शुल्क - १० ते १५ ऑगस्ट

 6. अभ्यासक्रमास सुरुवात- २० ऑगस्ट

loading image