यंदाची पेट ठरणार शेवटची ; यूजीसीच्या नव्या नियमामुळे होईल बदल; रविवारी ‘सेट’चे आयोजन

राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा अर्थात नेटच्या गुणांच्या आधारे पीएचडी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची घोषणा नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे.
phd eligibility test pet ugc new rules on sunday set exam
phd eligibility test pet ugc new rules on sunday set examSakal

Pune News : राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा अर्थात नेटच्या गुणांच्या आधारे पीएचडी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची घोषणा नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाची पीएचडी पात्रता परीक्षा अर्थात पेट ही या पद्धतीतील शेवटची परीक्षा ठरण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाकडून यूजीसीशी यासंबंधी पत्रव्यवहार केला जात असून, शेवटच्या पेट परीक्षेसाठी परवानगी मिळू शकते. त्यामुळे पुढील आठवड्यात पेट परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरवात करत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासह राज्य व देशभरातील विद्यार्थी पेट परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पीएच.डी.देण्याची घोषणा झाल्याने विद्यापीठाची पेट परीक्षा होणार की नाही,अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली.

विद्यापीठाने सुद्धा पेट परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र,युजीसीच्या घोषणेमुळे विद्यापीठाने सावध भूमिका घेत युजीसीकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून पेट परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली जाणार आहे.

म्हणून शेवटची पेट होईल

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पीएच.डी.प्रवेशाच्या संख्येत घट झाली आहे. त्यात केवळ नेट परीक्षेच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना आणखी काही महिने पीएच.डी. प्रवेशाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, यूजीसीकडून विद्यापीठाला शेवटची परीक्षा घेण्याची संधी दिली जाईल अशी दाट शक्यता आहे.

रविवारी सेट परीक्षा

सहाय्यक प्राध्यापकपदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेटचे रविवारी (ता.७) आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील एक लाख २५ हजाराहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले असून, ऑफलाईन पद्धतीची ही शेवटची परीक्षा असणार आहे. सेट विभागाच्या वतीने परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com