PNB Peon Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदांसाठी भरती, 12वी पास करू शकतात अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PNB Peon Recruitment
PNB Recruitment 2022: पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदांसाठी भरती, 12वी पास करू शकतात अर्ज

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदांसाठी भरती, 12वी पास करू शकतात अर्ज

PNB Peon Recruitment 2022: पंजाब नॅशनल बँकेने शिपाई पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 12वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करावे लागतील. केवळ तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, ज्यांचे वय १८ ते २४ वर्षे आहे. यापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील. (Recruitment for the posts of peon in Punjab National Bank, apply for 12th pass)

हेही वाचा: ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?

शैक्षणिक पात्रता-

12वी पास उमेदवार PNB मध्ये शिपाई पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी लिहिण्याचं आणि बोलण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण असणं ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.

पगार-

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 14500 रुपये ते 28145 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. यासोबतच इतर काही भत्तेही दिले जाणार आहेत.

हेही वाचा: नोकरी सोडून 110 दिवसांत 6000 किमी धावली; Ultra Runner सुफियाने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

अर्ज कसा करायचा-

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून तो पुढील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता-

Chief Manager,

HRD Department, Punjab National Bank,

Circle Office Malda, PS English bazar,

West Bengal -732101.

उमेदवार अधिसूचनेवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

Web Title: Pnb Recruitment 2022 Recruitment For The Posts Of Peon In Punjab National Bank Apply For 12th Pass

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..