Maharashtra Police Recruitment 2025 : पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत १० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील भरली जाणार असल्याची माहिती आहे.