esakal | काेराेनाचा कहर : यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा पुढे जाणार?
sakal

बोलून बातमी शोधा

National Defence Academy

काेराेनाचा कहर : यूपीएससी एनडीए 2021 ची परीक्षा पुढे जाणार?

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : देशातील बहुतांश राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे बोर्डाच्या परीक्षा व अनेक प्रवेश परीक्षा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. देशात दाेन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्याची परिस्थिती पाहता यूपीएससी एनडीए परीक्षा (UPSC NDA Exam 20201) पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा येत्या रविवारी (ता. 18 एप्रिल) घेण्यात येणार आहे. खरंतर एनईईटी पीजी 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करु लागले आहेत. यासंदर्भात आयोग काय निर्णय घेणार याकडे युवा पिढीचे लक्ष लागून राहिले आहे.

देशात काेविड 19 रुग्णांची माेठ्या संख्येने भर पडत आहे. बहुतांश राज्यांना आराेग्य सुविधांबाबत सातत्याने वेगवेगळ्या गाेष्टींचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याबराेबरच 1185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकतर देशाच्या विविध राज्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे तर काही ठिकाणी निर्बंधांचे धिंडवडे उडविले जात आहेत. वाढत्या काेराेनाच्या संसर्गामुळे यूपीएससी एनडीए 2021 सह कोणत्याही परीक्षेस जाण्यास विद्यार्थ्यांना धाेकादायक वाटत आहे.

यूपीएससी एनडीए 2021 आयोगाने यापुर्वीच परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी upsc.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा असे सूचित केले आहे. दरम्यान आजपर्यंत यूपीएससीने एनडीए 2021 च्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. अशा परिस्थितीत एनडीएची परीक्षा 18 एप्रिल रोजी नियोजित तारखेला घेतली जाण्याची शक्यता आहे.

यूपीएससी एनडीए 2021 परीक्षा केंद्र यादी

अगरतला, अहमदाबाद, आयझॉल, प्रयागराज (अलाहाबाद), बेंगलुरू, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, धारवाड, दिस्पूर, गंगटोक, हैदराबाद, इम्फाल, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता , लखनऊ, मदुरै, मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पटना, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलांग, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम.

उमेदवारांनाे मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

सर्व उमेदवारांना मास्क घालावा लागेल.

मास्क नसलेल्या उमेदवारांना प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

उमेदवारांना आवश्यकतेनुसार पडताळणीसाठी त्यांचे मास्क काढावे लागतील.

उमेदवार पारदर्शक बाटलीमध्ये सॅनिटायझर (लहान आकाराचे) आणू शकतात.

उमेदवारांना कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षा हॉलच्या आत सामाजिक

अंतरासह “वैयक्तिक स्वच्छता” पाळावी लागेल.

उमेदवारांना ब्लॅक बॉल पॉईंट पेन आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण उमेदवारांना केवळ ब्लॅक बॉल पॉईंट पेनसह हजेरी यादी आणि ओएमआर उत्तर पत्रिका भरणे आवश्यक आहे.

कृपया नोंद घ्या की परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश परीक्षा नियोजित वेळेच्या 10 मिनिटांपूर्वी म्हणजेच फोरनून सत्रासाठी सकाळी 9:50 आणि दुपारच्या सत्रासाठी 01:50 वाजता बंद ठेवला जाईल. प्रवेश बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश घेता येणार नाही.

उमेदवार कोणताही मोबाइल फोन (स्विच ऑफ मोडमध्ये देखील), पेजर किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा प्रोग्राम करण्यायोग्य डिव्हाइस किंवा स्टोरेज मीडिया जसे की पेन ड्राईव्ह, स्मार्ट घड्याळे इत्यादी किंवा कॅमेरा किंवा ब्लूटूथ डिव्हाइस किंवा इतर कोणत्याही उपकरणांच्या ताब्यात असू शकत नाही. किंवा एकतर कार्यरत असणारी वस्तू किंवा परीक्षेच्या वेळी संप्रेषण साधन म्हणून वापरण्यास सक्षम मोड स्विच ऑफ मोडमध्ये सक्षम आहेत. या सूचनांचे कोणतेही उल्लंघन केल्यास भविष्यातील परीक्षांना बंदी घालण्यासह शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल. मौल्यवान / महागड्या वस्तू आणि पिशव्या देखील परीक्षा स्थळाच्या आत घेण्यास परवानगी नाही.

काळजात धडकी भरवणाऱ्या वायरमनच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

UPSC परीक्षा जवळ आली असतानाच वडिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना ICU त ठेवले, पुढे काय झाले वाचा सविस्तर