Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

Ivy League Scholarship : छोट्या शहरातूनही जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे प्रणवने सिद्ध केले. १३ व्या वर्षीच त्याने मोठी स्वप्ने पाहून नियोजनबद्ध तयारी सुरू केली. गणिताचा उपयोग करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा त्याचा उद्देश आहे.
Pranav Ilango

Pranav Ilango

esakal

Updated on: 

तुम्ही ध्येये मोठी ठेवली तर ती प्रामाणिक कष्ट आणि चिकाटीने गाठू शकता. काही गोष्टी कठीण असल्या तरी त्या अशक्य नसतात. मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहचता येते. तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील प्रणव इलांगो या १७ वर्षांच्या तरुणाने हेच साध्य करून दाखवले आहे. प्रणवला अमेरिकेतील प्रतिष्ठित 'आयव्ही लीग' (Ivy League) संस्था असलेल्या 'ब्राउन युनिव्हर्सिटी'मध्ये प्रवेश मिळाला आहे. विशेष म्हणजे, त्याला ३.५५ कोटी रुपयांची पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com