मेंदूविकास आणि भाषा

भाषा आणि साक्षरता यात मूलतः फरक असतो. तो आपण समजून घ्यायला हवा.
brain development and language
brain development and languagesakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

भाषा आणि साक्षरता यात मूलतः फरक असतो. तो आपण समजून घ्यायला हवा. भाषा (शब्द, चिन्हे आणि हावभावांद्वारे साधला जाणारा संवाद) मानवी मेंदूसाठी लागणारा मूलभूत घटक असून, साक्षरता (वाचण्या-लिहिण्याची क्षमता) ही मेंदूच्या उत्क्रांतीतील एक नवीन संकल्पना आहे. भाषाविकासामुळे अस्खलित वाचन आणि लेखनक्षमतांचा पाया तयार होतो.

विविध अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की, मानवाच्या सुरुवातीच्या वर्षांत मेंदूची वाढ उल्लेखनीयरीत्या होते. मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असतो. जर्नल ऑफ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या महत्त्वपूर्ण संशोधनातून हे दिसून आले आहे की, भविष्यात घडणाऱ्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक बदलांचे अनुभव घेण्यासाठी व त्यातून आवश्‍यक तो विकास साधण्यासाठी मेंदूला भाषेचा खूप उपयोग होतो.

खरं तर, अनेक संशोधनांनी असेही सुचवले आहे की, शैक्षणिक यशाच्या बाबतीत सर्वात मोठा अंदाज बांधू शकणारा घटक म्हणजे चांगली भाषा आणि साक्षरतेच्या विकासाबाबतच्या संधी. या सर्व बाबींचा विचार करून तुमच्या पाल्याची आकलनक्षमता वाढवणारी गुरुकिल्ली आम्ही तुम्हाला देत आहोत. पालक या नात्याने खालील ६ गोष्टी तुम्ही आवर्जून करून बघा.

संभाषणात गुंतवून ठेवा

भाषाकौशल्य विकसित करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे मुलांशी बोला. त्यांना संभाषणात गुंतवून ठेवा. मूल जितके जास्त शब्द ऐकते, तितका त्याचा शब्दसंग्रह वाढतो, त्याची आकलनक्षमता वाढते आणि त्याची विचारप्रक्रियाही गतिमान होते.

भाषा समृद्ध करणारे वातावरण

तुमच्या बोलण्यात जाणीवपूर्वक विविध प्रकारचे शब्द वापरा. त्यामुळे मुले नवनवीन शब्द ऐकतील आणि त्यांना लक्षात ठेवतील. वस्तूंना नवीन लेबल लावणे, गाणी-कविता ऐकणे व त्यातील यमक शोधणे असेही खेळ खेळता येतील. भरपूर विशेषणांसह तपशीलवार वर्णन करणाऱ्या गोष्टी मुलांना सांगा. विविध खेळ, कथांमधील पात्र, टोपणनावे लक्षात ठेवायला सांगा. त्यांना पर्यायी शीर्षके तयार करण्याची मजा अनुभवा.

मोठ्या वाक्यांची जादू

लहान मुलांशी संवाद साधताना छोटी वाक्ये वापरावीत असे सांगितले जाते. मात्र, काही वेळा जाणूनबुजून मोठी वाक्ये वापरणे फायदेशीर ठरते. हुशार पालक ही ट्रिक वापरून मुलांच्या मेंदूला चालना देऊ शकतात. मोठ्या वाक्यांमुळे मुलांच्या मेंदूला वाक्यरचना, व्याकरण, शब्द समजून घेण्याची व ते कसे वापरतात हे पाहण्याची संधी मिळते.

वाचनाचा आनंद

मुलांच्या आजूबाजूला पुस्तकांचे वातावरण तयार करा. विविध प्रकारच्या पुस्तकांमुळे मुलाच्या विविध संकल्पना विकसित होतील. त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण होईल. मुलांनी त्यांच्या पालकांना वाचताना पाहिल्यास तेही वाचन करू लागतील.

प्रतिसाद द्या, व्यक्त व्हा

संवादाचे प्रयत्न निष्फळ ठरताहेत, असेही तुम्हाला वाटेल. मात्र, भविष्यातील भाषिक ज्ञान आणि आकलनक्षमता वाढण्यासाठीचा तो पाया आहे, हे लक्षात ठेवा. मुलांचे बोबडे बोल, छोट्या सोप्या शब्दांचा उच्चार करण्याचा प्रयत्न, वाक्य तयार करण्याची बडबड या सगळ्या गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद द्या. त्यांच्या छोट्या छोट्या चुका लगेच दुरुस्त करू नका. त्याऐवजी त्यांना बोलण्यास प्रोत्साहित करा. अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना, संवाद यातूनच आपला मेंदू अधिक विकसित होत असतो.

चर्चेला वाव देणारे प्रश्‍न विचारा

‘होय’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे असलेले प्रश्‍न विचारण्याऐवजी ज्यावर मुले अधिक बोलू शकतील, चर्चा करू शकतील असे प्रश्‍न विचारा. त्यामुळे मुले मुक्तपणे संवाद साधण्यासाठी उद्युक्त होतील. मुलांची भाषा आणि सामाजिक कौशल्ये नैसर्गिकरीत्या विकसित करण्यावर भर द्या.

मुलांची भाषाविषयक क्षमता अधिक वाढवण्यासाठी काही ‘ट्रिक्स’ व सोपी तंत्रे समजावून सांगणारे व्हिडिओ TheIntelligencePlus च्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com