शब्देविण संवादू...

डोळ्यांसमोर एक चित्र आणा की, तुम्ही एका खोलीत काहीही न बोलता, पण अत्यंत आत्मविश्‍वासाने प्रवेश करत आहात. तुमच्या चालण्यात-बोलण्यात सहजता आहे.
presentation
presentationsakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

डोळ्यांसमोर एक चित्र आणा की, तुम्ही एका खोलीत काहीही न बोलता, पण अत्यंत आत्मविश्‍वासाने प्रवेश करत आहात. तुमच्या चालण्यात-बोलण्यात सहजता आहे. चेहऱ्यावर विश्‍वासक हास्य आहे. यामुळे तुमचा त्या खोलीतला प्रवेश हा अत्यंत सकारात्मकतेने होत आहे. सगळयांचे तुमच्याकडेच लक्ष आहे.

या उलट, दुसऱ्या प्रसंगात असे घडते आहे की, तुमच्या मित्राने त्याच्या ‘प्रेझेन्टेशन’ची खूप तयारी केली आहे, तरीही प्रत्यक्ष व्यासपीठावर चढल्यावर त्याचे पाय लटपटत आहेत, शब्द अडखळत आहेत. त्याची नजरही अस्थिर आहे. वरील दोन्ही प्रसंगांचा विचार केला, तर शाब्दिक संवादांचे वर्चस्व असलेल्या जगातही न बोलता आपल्या देहबोलीने अनेक गोष्टी साध्य करता येतात, हे आपल्या लक्षात येते.

प्रभावी देहबोली ही मानवी परस्परसंवादासाठी वरदान ठरलेली एक कला आहे. अनेकदा आपली कृती शब्दांपेक्षा जास्त परिणाम साध्य करते. देहबोलीतील बारकावे समजून घेऊन त्यांचे संवादातील महत्त्व लक्षात घेतले, तर व्यक्तिमत्त्व विकास करणे सहज सोपे होते. आपल्याही नकळत आपण अनेक कृती करत असतो आणि त्याचा विशिष्ट अर्थही निघत असतो. चला तर, समजून घेऊया आपण कळत-नकळतपणे बोलत असलेली ही शब्देविण संवाद साधू शकणारी भाषा.

  • नजरेला नजर भिडवा : समोरच्याच्या नजरेला नजर देऊन बोला. त्यातून तुमचा आत्मविश्‍वास जाणवतो.

  • ताठ उभे राहा : चालताना आणि बसल्यावरही पाठीचा कणा ताठ, खांदे सरळ ठेवा.

  • खरे हास्य : छद्मी, खोटे किंवा कामचलाऊ हास्य चेहऱ्यावर ठेवू नका. मनापासून आणि समोरच्याला प्रसन्न वाटेल असे सुहास्य चेहऱ्यावर ठेवा.

  • निरीक्षण करा : समोरच्याच्या देहबोलीचे सूक्ष्म निरीक्षण करा आणि त्यानुसार वागा.

  • हस्तांदोलन : आत्मविश्‍वासाने आणि ठामपणे हस्तांदोलन करण्याची सवय करा.

  • विचित्र सवयी : बोलताना हात-पाय हलवणं, डोके खाजवणं अशा सवयी बदला.

  • नातेसंबंध : विविध प्रकारच्या व्यक्तींशी नाते जोडताना कोणाच्याही अतिजवळ जाऊ नका. योग्य ते अंतर राखा.

  • हेतुपुरस्सर हालचाली : व्यासपीठावर बोलताना संपूर्ण जागेचा वापर करा. कुठल्या तरी एकाच कोपऱ्यात उभे राहून बोलू नका.

  • चेहऱ्यावरील हावभाव : तुम्ही जो विषय मांडत आहात, त्यानुसार आवाज आणि चेहऱ्यावरील हावभाव ठेवा.

  • काळजीपूर्वक ऐका : समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐका. तुम्ही त्याचे बोलणे नीट ऐकत आहात, असे त्याला वाटू द्या.

  • हातांचा प्रभावी वापर : तुमचे मुद्दे ठामपणे मांडण्यासाठी हातांचा प्रभावी वापर करा. मात्र, खूप हातवारेदेखील करू नका.

  • स्नायूंच्या हालचाली : जबड्याच्या विचित्र हालचाली करणे किंवा मुठी आवळणे अशा कोणत्याही प्रकारच्या कृती करणे टाळा.

  • टक लावून पाहू नका : एखाद्या व्यक्तीकडे दीर्घ काळ टक लावून पाहू नका. त्यामुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होते.

  • मोकळी देहबोली : हाताची घडी घालून बोलण्यापेक्षा मोकळेपणाने बोला.

  • सकारात्मक भाव : बोलताना मध्ये मध्ये हसणे, योग्य तिथे मान हलवणे अशा छोट्या गोष्टींमुळे समोरच्याचे लक्ष वेधून घ्या.

  • सातत्य : तुमच्या बोलण्यात, हालचालीत सातत्य ठेवा. गोंधळ निर्माण करू नका.

प्रभावी देहबोली आत्मसात करणे याचा अर्थ केवळ इतरांवर तात्पुरती छाप टाकणे किंवा समोरच्याच्या मनात आपली खोटी प्रतिमा निर्माण करणे नाही, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात जाणीवपूर्वक बदल करणे होय. हे बदल कसे करायचे? त्याचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा वापर करून घ्यायचा? याचे धडे आम्ही देतो. प्रभावी देहबोलीबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला ‘द इंटेलिजन्स प्लस’ या यू-ट्यूब चॅनेलवर बघायला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com