परदेशी शिकताना : उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य

जगभरात काल मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला गेला. सध्याच्या काळात शैक्षणिकदृष्ट्या झपाट्याने बरेच बदल होत आहेत.
mental health
mental healthsakal

- ॲड. प्रवीण निकम

जगभरात काल मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला गेला. सध्याच्या काळात शैक्षणिकदृष्ट्या झपाट्याने बरेच बदल होत आहेत. या सगळ्यात मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे, ही खरी गरज आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी धडपडत असताना तो विविध मानसिकतेतून जात असतो.

शिक्षणाची सीमा वाढवण्याची आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याची ही एक प्रकारची चांगली संधी असते. पण सुरुवातीच्या काळात त्यांना देखील एक ना अनेक अशा मानसिक समस्यांना सामोरे जावे जाते.

अजूनही उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनाही कोणता कोर्स करायचा? कोणता अभ्यासक्रम निवडायचा? कोणते विद्यापीठ निवडायचे? या तीन टप्प्यांवर अनेक प्रश्‍न पडतात. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत दिसून येतात. पुढे जाऊन मग नवीन शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेताना वेळ लागतो, तर काही विद्यार्थ्यांना भाषा आणि संस्कृती याविषयी निराळी भीती असते.

मात्र, तुम्ही ज्या भागात उच्च शिक्षणासाठी जाणार आहात. त्या भागाची भाषा व संस्कृतीमूल्य याविषयी हळूहळू आपोआप ओळख होऊ लागते. ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, आपल्या जीवनशैलीत एक सकारात्मक बदल दिसून येतो. संभाषणाचे माध्यम म्हणूनही आपल्याला सोईस्कर अशी भाषा वापरायला हरकत नाही. त्या भागाची भाषा शिकलात तर तुमचा प्रवास अधिक सुकर होईल.

सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील मुले असो की, शहरातील विद्यार्थी असो, त्यांना विद्यापीठ वातावरणाशी समरस व्हायला वेळ लागतो. तसेच, बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत भेदभाव, रॅगिंग असे अनेक त्रासदायक प्रकार घडत असतात किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे ते मानसिक ताण-तणावात जगत राहतात.

आपल्याकडे ‌नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहण्याबाबत उच्च शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक आणि करिअर मार्गदर्शक उपलब्ध करण्याची तरतूद आहे. तरीही, कोणासोबत मन मोकळे करायचे तर वेळेची तफावत असते. वेळ, वातावरण, भाषा आणि जीवनशैली सारे वेगळे असले तरी, मानसिक ताणात जगण्याची आवश्यकता नाही.

इतकेच नाही, तर या उच्च शिक्षणाच्या प्रवासाच्या दरम्यान आर्थिक बाजू जुळवण्याच्या धडपडीत दिसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती व इंटर्नशिप, अर्धवेळ नोकरी असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, परंतु याचे अभ्यासासोबत व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे.

विशिष्ट वयानंतर तरुणांमध्ये अनेकांना ‘जॉब बर्नआऊट’ची भावना होत असते. म्हणजे आपण करतोय त्या कामात समाधान मिळत नाही, मनाप्रमाणे पैसेही मिळत नाहीत, त्या कामात रस वाटेनासा होतो. त्या वेळी ते नकारात्मक वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात. तर पदवी - पदव्युत्तर शिक्षण घेतानादेखील ज्या विषयात शिकत आहोत. त्यात रस निघून जातो आणि नवा विषय आवडू लागतो.

आपल्या उच्च शिक्षण घेण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या विद्यापीठातील शिक्षक-विद्यार्थी आणि त्याच्यापलीकडे जाऊन तेथील आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांशी संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सकारात्मक बदल आपोआप घडवून येतात. तुम्हाला नवीन लोकांना भेटता येईल आणि विविध परंपरा- संस्कृती शिकता येतील.

कारण, तुमच्या मानसिक आरोग्याचा कळत- नकळतपणे परिणाम अभ्यासावर होताना दिसून येतो. प्रत्येक विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणात तसा बराच फरक आहे. मग ते भारतीय असो की परदेशी. त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यास कल्चर शॉक, रिव्हर्स कल्चर शॉक आणि भीती, ताण यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. यात पुन्हा शहरी आणि ग्रामीण ही दरी आहेच.

भाषेच्या, पेहरावाच्या व राहणीमानाच्या न्यूनगंडात बरेच विद्यार्थी सुरुवातीच्या काळात राहताना दिसतात. त्यातील तणाव वाढण्याच्या आधी त्यांचे मानसिकदृष्ट्या संतुलन राखणे गरजेचे आहे. याकरिता अनेक संस्था, अनेक व्यक्ती आपापल्या पातळीवर जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आधार घेणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवाही प्रवासात मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल, तर विद्यार्थी अधिक उंच भरारी घेऊ शकतो.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com