परदेशी शिकताना : ‘स्टेम’ क्षेत्रावर आधारित मुलींसाठीची शिष्यवृत्ती

मुलींची उच्च शिक्षणात रूची वाढवणे, ही खरी काळाची गरज आहे. याच उद्देशाने सरकारमार्फत मुलींसाठी विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात.
Scholarship for girls based on STEM
Scholarship for girls based on STEMsakal

- ॲड. प्रवीण निकम

मुलींची उच्च शिक्षणात रूची वाढवणे, ही खरी काळाची गरज आहे. याच उद्देशाने सरकारमार्फत मुलींसाठी विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. मात्र, याविषयी कित्येकांना माहिती नसल्याने उच्च शिक्षणासाठी फायदा होऊ शकत नाही. हे चित्र सर्रासपणे पाहायला मिळते. म्हणून, मागील दोन लेखांत आपण ‘स्टेम’विषयी माहिती जाणून घेतली. या लेखात ‘स्टेम’साठीच्या (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिष्यवृत्तीसाठीची माहिती समजून घेणार आहोत.

महिलांचे प्रमाण कमी

‘युनेस्को’चे मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले, की ‘स्टेम’ विषयांचा अभ्यास करणाऱ्या महिला विशेषतः कमी आहेत. संगणक, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांत फक्त १९%, तर भौतिक विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये अनुक्रमे ३९ टक्के आणि ३७ टक्के.

त्यामुळेच, ब्रिटिश कौन्सिलतर्फे ‘स्टेम’मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यात भारतीय मुलींसाठी राखीव जागा देखील आहेत. शिष्यवृत्तीचे‌ हेच मूळ उद्दिष्ट असते की, तळागाळातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देऊन नवनिर्मिती करणे. जेणेकरून ‘स्टेम’ करिअर क्षेत्रात महिलांचा सहभाग जास्त वाढला जाईल आणि त्यांनादेखील रोजगार निर्माण होईल.

पात्रता - उमेदवाराचे वय किमान १८‌ वर्षे पूर्ण असावे. तर, पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संशोधन करत असल्यास मान्यताप्राप्त विद्यापीठाचा प्रवेश असावा. किमान इंग्रजी विषयाची प्राथमिक जाण असावी.

कोणाला शिष्यवृत्ती मिळू शकते?

१) जे अल्प उत्पन्न गटात मोडतात, तसेच ज्यांना आर्थिक दृष्ट्या मदतीची गरज आहे.

२) तसेच, शिक्षण सुरू असल्यास जो उमेदवार यू.के. विद्यापीठातील पदव्युत्तर स्तरासाठी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करेल किंवा पुढील तीन वर्षांत पीएच.डीचे सर्व घटक पूर्ण करेल.

३) यू.के. विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यास/संशोधनासाठी आवश्यक अशी इंग्रजीची सक्षमतेची पातळी गाठू शकेल.

४) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जाणीव असून, ‘स्टेम’ आधारित कार्यक्षेत्राविषयी आवड असेल.

शिष्यवृत्तीचे फायदे - यू.के.ची विद्यापीठे जागतिक दर्जाचे असून, ‘स्टेम’ विषयात आघाडीवर आहेत. शिष्यवृत्तीमुळे आर्थिक साहाय्य मिळते. यात ट्यूशन फी, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा आणि आरोग्य इत्यादींचा समावेश असतो.

अर्ज कुठे करता येईल?

तुम्हाला पुढील शैक्षणिक वर्षासाठी लवकरच ब्रिटिश कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल. यात तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकता. मात्र, तुमची निवड दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार होईल. याशिवायही इतरही खासगी कंपन्या व संस्थांमार्फत मुलींसाठीच्या विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com