परदेशी शिकताना : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा

भारतात एकीकडे शिक्षणाची दुरवस्था असताना दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या वाटा खुणावत आहेत. काळाबरोबर शिक्षण क्षेत्रातही बदल झाले.
Abroad Education
Abroad Educationsakal

- ॲड. प्रवीण निकम

भारतात एकीकडे शिक्षणाची दुरवस्था असताना दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या वाटा खुणावत आहेत. काळाबरोबर शिक्षण क्षेत्रातही बदल झाले. विकास आणि विस्तार या शैक्षणिकदृष्ट्या दोन्ही बाजूंवर अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गगनभरारी घेत आहेत. दुसरीकडे परदेशात उच्च शिक्षणासाठी अनेकांना झटावे लागत आहे.

शैक्षणिकदृष्ट्या प्राथमिक सुविधा नसणे, करिअर विषयीच्या जनजागृतीचा, मार्गदर्शनातील अपुरेपणा, चाकोरीबद्ध शैक्षणिक आयुष्य, ग्रामीण व शहरी प्रवाहातील शैक्षणिक, सामाजिक दरी यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक जीवनावर परिणाम होतो.

पूर्वी भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घ्यायला गेला की चाचपडायचा. शिक्षण पद्धती समजून घ्यायला काही महिने जायचे. अशी स्थिती का निर्माण व्हायची? कोणते असे परदेशी उच्च शिक्षणातील वेगळेपण आहे? या लेखातून जाणून घेऊयात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता भविष्यात विद्यार्थ्यांची अशी स्थिती घडणार नाही. आपली शिक्षण पद्धती जागतिक स्तरावर सर्वत्र स्वीकारली जाईल, अशी मांडणी होताना दिसून येते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिकदृष्ट्या काही सकारात्मक बदल करू पाहत आहे. यात काही देशाला जागतिकदृष्ट्या प्रगतीसाठी चालना देणाऱ्या गोष्टी आहेत तर काही नव्या पिढीसाठी आव्हानात्मक बाबी आहे.

नेतृत्व कौशल्य, जीवन कौशल्ये, चांगले विचारवंत, अष्टपैलू आणि कल्पकता अशा व्यक्ती विकसित करणे, हे दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. संविधानिक, नैतिक आणि घटनात्मक मूल्ये, बौद्धिक कुतूहल, वैज्ञानिक स्वभावधर्म, सेवाभाव याशिवाय शास्त्र, सामाजिक शास्त्र, कला, मानव्यशास्त्रे, भाषा याबरोबरच व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यवसायाशी संबंधित विषय यासह क्षमता विकसित करणे शक्य झाले पाहिजे.

उच्च शिक्षणामुळे वैयक्तिक यश आणि आत्मज्ञान, निर्माणकारी सार्वजनिक सहभाग आणि समाजासाठी उत्पादनशील योगदान साध्य करता यायला हवे. अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन व कामाचे स्वरूप यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सक्षम केले पाहिजे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता येणार आहे. महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. नवीन मसुद्यानुसार कला आणि विज्ञान या शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. परदेशातील अभ्यास पद्धतीचा विचार केल्यास जास्तीत जास्त प्रात्यक्षिक गोष्टींवर अभ्यासक्रमावर भर दिलेला असतो.

कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असताना देखील आवडीच्या क्षेत्रात पार्ट टाइम जॉब, इंटर्नशिप करतात. त्यामुळे, त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळते. खरंतर कोणताही शैक्षणिक अभ्यासक्रम लवचीकता असावा. यामुळे अध्ययनातून रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात.

मातृभाषेत साध्या संकल्पना नीट समजून घेणे, मातृभाषेत शिकायला सुरुवात करणे आणि नंतर शास्त्र अथवा विज्ञान दोन भाषांमध्ये म्हणजे मातृभाषा आणि इंग्रजीत शिकणे अभिप्रेत आहे. त्यामुळे, परदेशात गेल्यावर भाषेविषयी निर्माण होणारे दडपण व भीती साहजिकच कमी होईल. विद्यार्थी दशेत विविध भाषा शिकण्यास मुभा असल्यास उच्च शिक्षणाच्या संधी अधिक रुंदावत जातात.

उच्च शिक्षणाच्या व त्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने मुलींना व आर्थिक/सामाजिक दृष्ट्‍या दुर्बल घटकांना अधिकाधिक आर्थिक साहाय्य मिळवून देण्याची गरज अहवालात व्यक्त होते. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात उच्च शिक्षणाच्या रचनात्मक बदलावर भर दिला आहे. शैक्षणिक बाबींमध्ये योग्य बदल न केल्यास परदेशी विद्यापीठे उच्च शिक्षणात गुंतवणूक करतील.

आंतरराष्ट्रीयीकरण होताना दिसून आले तरी तळागाळातील विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे. परदेशात एकाचवेळी दोन शाखेत मिळवण्याचे स्वतंत्र आहे‌. तसेच भारतातही अभ्यास करता येणे शक्य होणार आहे‌. दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट फक्त वैयक्तिक रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी तयार करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहून चालणार नसून समृद्ध राष्ट्र तयार करण्यासाठी उच्च शिक्षण हीच खरी गुरुकिल्ली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com