परदेशी शिकताना : जर्मनीतील शिक्षणप्रणाली!

देशाची शैक्षणिक व सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये निराळी असतात. परदेशी शिक्षणाच्या वाटा व संधी शोधत असताना आपल्याला याविषयी माहिती नसते.
studying-abroad
studying-abroadsakal

- ॲड. प्रवीण निकम

देशाची शैक्षणिक व सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये निराळी असतात. परदेशी शिक्षणाच्या वाटा व संधी शोधत असताना आपल्याला याविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे. भारताचे जर्मनीशी निराळे नाते आहे. अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जातात, तर भारतात अनेक जर्मन कंपन्या आहेत.

जर्मनीने शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या वेगळी ओळख निर्माण केली आहेच. नवनवीन सिद्धांत, शिक्षणपद्धती, नोकरीच्या संधी यात जर्मन देश आघाडीवर आहे. त्याने जगाला अनेक हुशार आणि प्रयोगशील माणसे दिली आहेत. यामागे तिथली शिक्षणपद्धती हे मुख्य स्रोत आहे.

जर्मनीत शालेय शिक्षणानंतर दोन प्रकारची विद्यापीठे आहेत. पहिला प्रकार म्हणजे टेक्निकल आणि इतर विद्यापीठे व दुसरा प्रकार म्हणजे अप्लाइड सायन्सची विद्यापीठे. याव्यतिरिक्त कला, संगीत, परफॉर्मिंग आर्टस यासाठी वेगळ्या संस्था आहेतच. सरकारी शिक्षण आणि खासगी शिक्षण यात फारसा फरक आढळत नाही.

आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोर्सेस इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने जर्मनीत उच्च शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. प्रामुख्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषतः मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी जर्मनीतील विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जर्मनीत पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षणही जर्मन आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही विनामूल्य दिले जाते.

तिथल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून व्यावसायिक शिक्षण सुरू होते. माध्यमिक शाळेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा एखादा व्यवसाय किंवा कौशल्य अधिक खोलात जाऊन शिकवले जाते. त्यासाठी शाळेमध्येच खास दोन दिवस ठेवलेले असतात. जर्मनमधील ही ‘ड्युअर सिस्टीम’ म्हणूनच उल्लेखनीय आहे.

प्रवेशापासून ते अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत, अभ्यासक्रम हा विद्यापीठ किंवा महाविद्यालयाद्वारे काही स्वतंत्रपणे ठरवतात. म्हणूनच तुमच्या आवडीच्या विद्यापीठात कोणते नियम लागू होतात हे शोधणे महत्त्वाचे असते. तिथे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जर्मन भाषेची ‘बी-२’ ते ‘सी-१’ ही पातळी पूर्ण करण्याची अट असते. याउलट इंग्रजी भाषेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या पदव्युत्तर पदवीच्या पातळीवर जास्त आहे.

आपल्याला जर्मनीमध्ये शिक्षण घेण्यासाठी सरकारच्या शिष्यवृत्ती सोबतच अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला स्वतःचा प्रकल्प तयार करावा लागतो. याशिवाय अमिराना स्कॉलरशिप शिष्यवृत्तीमध्ये विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना हेडलबर्ग विद्यापीठातून मेडिसिन आणि डेंटिस्टचा कोर्स करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते.

शिष्यवृत्तीच्या जोरावर आवडीच्या विषयात पदवी, पदव्युत्तर, पीएचडी अशा‌ विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतो. यामध्येही हेडलबर्ग विद्यापीठ, लीपझिग विद्यापीठ, ग्रीफ्सवाल्ड विद्यापीठ, फ्रीबर्ग विद्यापीठ, मारबर्ग विद्यापीठ, रोस्टॉक विद्यापीठ अशी अनेक महत्त्वपूर्ण विद्यापीठे आहेत.

जर्मनी विद्यापीठे, उपयोजित विज्ञान विद्यापीठे, इतर संशोधन संस्था, कंपन्या आणि फेडरल आणि राज्य संस्थांमध्ये सुसज्ज संशोधन सुविधांसह उत्कृष्ट अभ्यास आणि संशोधन पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com