परदेशी शिकताना : परदेशी शिक्षणासाठी चेवनिंग शिष्यवृत्ती!

सध्या बरीच तरुणाई नवनवीन क्षेत्रात काम करू पाहत आहे. यात तरूणांच्या कामाचा अनुभव, आवड आणि सामाजिक, शैक्षणिक जाण अधिक दिसून येते.
Chevening Scholarship
Chevening Scholarshipsakal

- ॲड. प्रवीण निकम

सध्या बरीच तरुणाई नवनवीन क्षेत्रात काम करू पाहत आहे. यात तरूणांच्या कामाचा अनुभव, आवड आणि सामाजिक, शैक्षणिक जाण अधिक दिसून येते. विशेषतः सामाजिक, शैक्षणिक, व्यवस्थापन आणि लोकसहभाग क्षेत्रात काम करताना अधिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातात. याकरिता विद्यार्थ्यांना ‘मीड करिअर मास्टर्सची’ आवश्यकता असते. या सगळ्यांसाठी ‘यु. के.’ गव्हर्नमेंटची चेवनिंग शिष्यवृत्ती हा उत्तम पर्याय आहे.

चेवनिंग ही जगातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मानली जाते. ती १९८३मध्ये सुरू करण्यात आली. फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस आणि इतर संस्थांद्वारे अनुदानित, निमअनुदानित मास्टर डिग्री कोर्ससाठी एक वर्षांचा अभ्यास ‘यु. के.’मध्ये करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीद्वारे भविष्यातील नेते, प्रभावशाली, निर्णयक्षम व्यक्तींशी सकारात्मक संबंध निर्माण करून आंतरराष्ट्रीय संबंध साधण्यास सोपे जाते.

चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले यशस्वी उमेदवार हे जगातील विविध देशांतून आणि वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून येतात. आपल्या जाणीवा व अनुभव यांच्याद्वारे कोर्स पूर्ण केल्यास त्यांना पुढे प्रत्यक्ष कामात मदत होते. या चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड कशी‌ होते? कोणते निकष मांडले जातात? अर्ज कसा करावा? या विषयी बरेच विद्यार्थी संभ्रमात असतात. या लेखाद्वारे ही माहिती नक्कीच मदत होईल.

1) निवडीचे निकष

चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी अर्जप्रक्रिया दरवर्षी ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावरून सुरू केली जाते. त्यासाठी अर्ज करण्यासाठी १६०हून अधिक देश आणि प्रदेशांमधील विद्यार्थी पात्र आहेत. याकरिता विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी पदवीच्या गुणांचा कोणताही निकष लावण्यात आलेला नाही.

या शिष्यवृत्तीसाठी २२ जुलैपर्यंत ‘यु. के.’तील विद्यापीठाचे अनकंडिशनल ऑफर लेटर असणे आवश्‍यक आहे. त्यासोबतच अर्ज करताना विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळ्या मास्टर प्रोग्रॅमची निवड करणे आवश्यक आहे. ते एकाच संस्थेतील किंवा तीन वेगवेगळ्या विद्यापीठांतील असल्यास हरकत नाही.

2) अर्जासाठी महत्त्वाच्या गोष्टी

एक महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी काम करत असलेल्या ठिकाणच्या विभाग प्रमुखाचे शिफारस (रेकमेंडेशन) पत्र असणे आवश्यक आहे. तसेच, इंग्रजी भाषेची पात्रता परीक्षा उत्तीर्ण असावी. पदवी संदर्भातील कागदपत्रे आणि रेज्युमे आदी बाबींची तयारी असावी आहे.

3) शिष्यवृत्तीअंतर्गत मिळणारे भत्ते

चेवनिंग शिष्यवृत्तीमध्ये विद्यापीठाची पूर्ण शैक्षणिक फी, महिन्याचा स्टायपेंड (तो महिना £१६५५ असून, तुम्ही लंडनमध्ये किंवा बाहेर शिकता यावर अवलंबून आहे), विमानाच्या तिकिटाचे भाडे, मेडिकल इन्शुरन्स, व्हिसा खर्च आदी बाबींचा समावेश आहे.

4) मुलाखतीचा टप्पा

चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी मुलाखत हा महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्याला अर्ज केल्यानंतर साधारणतः फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडीसंदर्भात कळविण्यात येते. मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती एप्रिल-मेमध्ये पार पडतात. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची सर्व अंगाने व्यक्तिमत्त्वाची चाचणी होते. त्यासोबतच त्याच्या कामाचा अनुभव, जीवनप्रवास व शिक्षणानंतरचे ध्येय याबाबींची विचारणा केली जाते. या संदर्भात मुलाखत देत असताना, खऱ्या कामाच्या भविष्यातील ध्येय-धोरणांची स्पष्टपणे‌ मांडणी, प्रभावीपणे मुद्दे मांडणे आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.

5) शिष्यवृत्तीचे फायदे

या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाच्या वाटा अधिक मोकळ्या होतात. पूर्णपणे आर्थिक मदत मिळाल्यामुळे ‘यु. के’मध्ये शिक्षण घेणे सोपे जाते. यामुळेच, जगभरातील स्कॉलरसोबत विशेष नेटवर्किंग संधी मिळते. निवड झालेल्या उमेदवारांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातही मदत करते. शिष्यवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात हे उमेदवार ही शिष्यवृत्ती घेतलेल्या जगातील ५५ हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांच्या विविध समुदायांत सामील होतात.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com