परदेशी शिकताना : गुणवत्तापूर्ण संशोधन

सध्या खूप मोठ्या प्रमाणात मुले परदेशी शिक्षण घेण्यासाठी भारताबाहेर जात आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी या अभ्यासक्रमातील परदेशी शिक्षणपद्धती व व्यापकता.
Abroad Study
Abroad Studysakal

- ॲड. प्रवीण निकम

सध्या खूप मोठ्या प्रमाणात मुले परदेशी शिक्षण घेण्यासाठी भारताबाहेर जात आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी या अभ्यासक्रमातील परदेशी शिक्षणपद्धती व व्यापकता. परदेशी शिक्षणपद्धतीमधील गुणात्मक संशोधन पद्धतीव्दारे होणारे संशोधनाचे कार्य हे विशेष आहे. अनेक भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये मोठ्याप्रमाणात संशोधन आणि शैक्षणिक बाबींची देवाणघेवाणही होत आहे.

1) विषयाची निवड

आपले दैनंदिन जीवन जगत असताना विविध प्रश्न व समस्यांनी चक्रावून जायला होते. आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा व त्यातून मार्ग शोधण्याची आवश्यकता असते. यातही प्रत्येक घटक व उपघटक महत्त्वाचा असतो. त्यामुळे पीएच.डी पदवी अभ्यासक्रमाचा विचार करता याच समस्यांवर आधारित आपल्याला हव्या त्या विषयाची निवड करता येते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमात मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य व संशोधन लेखन पूर्ण करण्यासाठी सेमिस्टर पॅटर्ननुसार विद्यापीठाच्या विषय निवड यादीनुसार विविध विषयाची निवड करावी लागते. त्यावर आधारित संशोधन लेख प्रसिद्ध करायला लागतो.

2) जागतिक स्तरावरील मार्गदर्शन

आपल्या संशोधन विषयावर आधारित मार्गदर्शक वेळोवेळी मार्गदर्शन करतातच. परंतु नवीन विषय मांडणीपासून ते समाजाला आकार देणारे धोरण ठरवण्यापर्यंत आपल्या ज्ञानाची निर्मिती आणि प्रभाव याविषयी देखील विद्यापीठात विविध स्रोत निर्माण केलेले असतात. जेणेकरून संशोधक विषयावर आधारित सामाजिक व शैक्षणिक संस्था व त्या अनुषंगाने तज्ज्ञ व्यक्तींसोबत थेट संवाद साधू शकतो.

3) आंतरराष्ट्रीय स्तरावर भेटी

विविध विद्यापीठे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन भेटींचे आयोजन करतात. त्यामुळे संशोधकांना एकत्र येण्याची संधी मिळते. यातही दोन भाग दिसतात. पहिला म्हणजे विद्यापीठ एक महिना ते एक वर्षाच्या भेटींसाठी परदेशातील विद्यापीठात नोकरी करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांच्या अर्जांचे स्वागत करते.

दुसरा भाग म्हणजे संशोधन विषयाची मांडणी करण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी विद्यापीठाला संशोधन कार्यासाठी भेट देता येते. तुमच्याकडे इथल्या ग्रंथालयांना भेट देण्याचा आणि स्वतंत्र संशोधक म्हणून संशोधन सेमिनारमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देखील आहे. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व परिसंवादामुळे तुमच्या संशोधन कार्याला अधिक चालना मिळते.

4) वेगळेपणा

संशोधनाच्या दृष्टीने परदेशी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र संशोधन विभाग असतो. प्रत्येक परदेशी विद्यापीठातील ग्रंथालये, अत्याधुनिक शैक्षणिक सोयीसुविधा, डिजिटल स्वरूपातील संशोधन लेख व पेपर व इतर दस्तऐवज हे विशेष आहेत. मोठ्याप्रमाणात संदर्भ ग्रंथ व साधने उपलब्ध असल्याने संशोधन कार्य अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते.

तसेच, पदव्युत्तर व पीएच.डी या दोन्ही अभ्यासक्रमासाठी हा संशोधन विभाग काम करतो. त्यामुळे आपल्या संशोधनाला अचूकता व नेमकेपणा येण्यासाठी, संशोधन कार्याला योग्य दिशा प्राप्त होण्यासाठी विभागातील तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. तेथील समन्वयक पदोपदी आपल्याला यासंबंधात मदत करतात.

शैक्षणिक संशोधन प्रक्रियेत संशोधकाला आपल्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी व आपली संशोधन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी माहिती प्राप्त करावी लागते ती म्हणजे व्यक्ती किंवा शैक्षणिक संस्था यांच्याकडून म्हणजेच ज्यांच्याकडून माहिती मिळवली जाते.

यातही महाविद्यालयांचे प्रतिनिधी त्यांच्या व्यापक समवयस्क गट आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय संरचनेमध्ये द्वि-मार्गी दुवा म्हणून काम करतात. अशा विविध स्रोतांच्या आधारे परदेशी शिक्षणातील संशोधन कार्य वैशिष्ट्यपूर्ण होते.

5) संशोधन अहवाल लेखन, संशोधन लेख

संशोधन अभ्यासाचा संशोधन अहवाल लेखन हा एक प्रमुख घटक आहे‌. त्यामुळे ते लेखन अगदी चपखल गृहीतक, उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आणि आयोजित केलेला संशोधन अभ्यास, आणि सर्वात उल्लेखनीय सामान्यीकरण आणि निष्कर्ष जोपर्यंत ते इतरांना प्रभावीपणे संप्रेषित केले जात नाहीत तोपर्यंत फारसे मूल्य नाही.

पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना विषय संशोधनाचा उद्देश इतरांना कळल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासाठी संशोधन अभ्यासाची शेवटची पायरी म्हणजे अहवाल लेखन, संशोधन लेखन आणि त्यासाठी कौशल्यांचा संच आवश्यक आहे.

अहवाल लेखनामुळे संशोधन कार्य कसे केले, त्यासाठी कोणती संशोधन पद्धती वापरली, न्यादर्श कसा निवडला, चले कोणती, परिकल्पना, उद्दिष्टे, गृहीतके कशी मांडलेली आहेत, कोणती साधने वापरली, कार्यवाही कशी केली. ही माहिती कशा प्रकारे संकलित केली, तिचे अर्थनिर्वचन कसे केले, कोणते निष्कर्ष व शिफारशी मांडल्या याचे नोंद व सादरीकरण करावे लागते.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेणिंग स्कॉलर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com