गणित अवघड जातेय? टेन्शन घेऊ नका..या आहेत सोप्या ट्रिक्स

math
math

तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये भयानक समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दल सांगणार आहे. आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेलच मी कोणत्या विषयाबद्दल बोलत आहे, हो गणित खरं म्हणजे गणिताला आपणच खूप भयानक बनवून ठेवले आहे. पण मला सांगा तुम्हाला कधीच कोणत्या विषयात पैकीच्या पैकी गुण सहजगत्या मिळत नाही, जितके गणितात मिळतात. याचा अर्थ काय गणित हा खूप सोपा विषय आहे. तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने  अभ्यास केल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती येईल.

खरं पाहायला गेलं, तर गणित हा विषय हा फार शिस्तप्रिय आहे. आता तुम्ही म्हणतात विषय शिस्तप्रिय कसा? हो आहेच गैर या विषयाचा तुम्ही शिस्तपूर्वक अभ्यास केला तर तुम्हाला कधीच कोणी थांबवू शकणार नाही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यापासून, आता तुम्ही म्हणणार शिस्त म्हणजे नेमके काय? तर गणित या विषयाचा अभ्यास करताना खाली दिलेल्या काही नियमांचे पालन करा म्हणजे झाले.

रोज नित्याने 30 मिनिट तुम्ही गणित या विषयाला दिलेच पाहिजेत 15 मिनिट जे काही शिकवले आहे त्याचा लिहून सराव करण्यासाठी आणि 15 मिनिट जो सिलॅबस झाला आहे, त्यावरचे न सोडविलेले उदाहरणे सोडवावी जास्त नाही 2 किंवा 3 आणि या साठी तुम्ही तुमची सेपरेट वही बनवावी. या वही मध्ये तुम्ही तुमच्या भाषेत पद्धती लिहायचे जेणेकरून परीक्षेवेळी हीच वही तुम्हाला खूप उपयोगी पडेल.

मुलांना फॉर्मुल्यांचे खूप टेन्शन असते. त्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. फॉर्मुल्याची एक वेगळी डायरी बनवायची. तुम्ही चार्टसुद्धा बनवू शकता. हे फॉर्मुला तुम्ही रोज झोपताना वाचायचे. फक्त वाचायचे पाठ करायचे  नाहीत. मोबाइल किंवा टीव्ही बघायचा नाही. त्यामुळे फॉर्मुला तुमचे सहज पाठ होतील त्यासाठी वेगळे कष्ट करायची गरज नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता खूप महत्वाचे बऱ्याच मुलांची तक्रार असते. खूप अभ्यास करूनही गणिताच्या पेपरला काहीच आठवत नाही. याचे कारण एकच गणित विषयाचा अभ्यास करताना तुम्ही बाकी विषयांसारखा करू नका. गणिताचा अभ्यास हा नेहमी तुम्ही तुलनात्मकरित्या केला पाहिजे. म्हणजे कसे?... समजा एखाद्या युनिट किंवा चॅप्टरमध्ये काही उदाहरणे वेगळ्या पद्धतीने सोडविलेली असतील, तर त्या दोन पद्धतीतील फरक समजून घ्या. कोणते उदाहरण कोणत्या पद्धतीने सोडविता येते, हे समजून त्याची नोंद तुमच्या वहीत करा. जेणेकरून तुम्हाला दोन्ही उदाहरणातील फरक कळेल. मित्रानो फक्त एवढ्याच तीन नियमांचा पालन करा. तुम्हाला गणितासारखा दुसरा कोणताच विषय सोपा वाटणार नाही.

- प्रा. वनिता लिमन (जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हडपसर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com