esakal | पुणे : अकरावीसाठी आतापर्यंत ७१ हजार १७८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

अकरावीसाठी आतापर्यंत ७१ हजार १७८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत सुमारे ७१ हजार १७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत तब्बल ३७.१ टक्के म्हणजेच अद्याप ४१ हजार ९८७ जागा अद्याप रिक्त आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेतंर्गत ३१७ महाविद्यालयांतील एक लाख १३ हजार २०५ जागांकरिता सुमारे ८९ हजार ५२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या, एक विशेष फेरी आणि सध्या सुरू असलेली प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या फेऱ्यातंर्गत जवळपास ६१ हजार २९९ विद्यार्थ्यांनी, तर कोट्यांतर्गत जवळपास नऊ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

एफसीएफएस प्रवेश फेरीतंर्गत ‘एटीकेटी’ची सवलत मिळालेले आणि दहावीचे इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी (सातवा संवर्ग) प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीतील विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता.१८) संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी वेळ देण्यात आला असून याच दिवशी रात्री उर्वरित रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.

अकरावी प्रवेशाचा आढावा :

 • महाविद्यालयांची संख्या : ३१७

 • प्रवेशासाठी एकूण जागा : १,१३,२०५

 • प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : ८९,५२९

 • प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७१,१७८

 • रिक्त जागा : ४१,९८७

प्रवेश फेऱ्यानिहाय आतापर्यंत झालेले प्रवेश :

प्रवेश फेरी : उपलब्ध जागा : पात्र विद्यार्थी : महाविद्यालये ॲलॉट झालेले विद्यार्थी : प्रवेश घेतलेले विद्यार्थी

 • पहिली नियमित फेरी : ९७,२७४ : ५६,७६७ : ३८,८३१ : २३,९५८

 • दुसरी नियमित फेरी : ७३,३१६ : ३५,६९४ : १५,९६७ : ७,३६०

 • तिसरी नियमित फेरी : ६५,९५६ : २९,५०५ : ९,२६१ : ३,३६०

 • विशेष फेरी : ६२,५९६ : २३,१४६ : २०,७४० : १६,७१९

 • प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) : ४५,८७७ : - : - : ९,९०२

कोट्यातंर्गत आतापर्यंत झालेले प्रवेश :

 • कोटा : महाविद्यालयांची संख्या : उपलब्ध जागा : झालेले प्रवेश : प्रत्यार्पित जागा

 • इन-हाऊस : २३९ : ८,३७५ : ४,५९१ : १,७६३

 • अल्पसंख्याक : ६७ : ११,५०८ : ३,२७६ : ६,५९०

 • व्यवस्थापन : ३०५ : ५,४१९ : २,०१२ : १,०५८

loading image
go to top