Pune Cantonment Recruitment : पुणे कँटोंमेंट बोर्डात मेगा भरती, ७ वी ते पदवीधरांसाठी जागा l Pune Cantonment Board Bharti 2023 recruitment job opportunity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Cantonment Board

Pune Cantonment Recruitment : पुणे कँटोंमेंट बोर्डात मेगा भरती, ७ वी ते पदवीधरांसाठी जागा

Pune Cantonment Board Bharti 2023 : पुणे कँटोंमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधीसुचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहिर करण्यात येईल.

एकूण जागा - १६८

पदांची नाव आणि शैक्षणिक पात्रता

कंप्युटर प्रोग्रामर (१ जागा) - कंप्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आयटी किंवा कंप्युटर इंजिनिअरींगमध्ये पदवी कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कंप्युटर सायंसची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.

वर्कशॉप सुप्रिटेंडंट (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून ३ वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमध्ये बी. ई. किंवा बी. टेक पास असावे.

फायर ब्रिगेड सुप्रिटेंडंट (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि NFSC कडून सब ऑफिसर कोर्समध्ये प्रमाणपत्र घेतलेले असावे.

सहाय्यक बाजार सुप्रिटेंडंट (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी वेग नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक.


जंतुनाशक (१ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त शाळेतून ७ वी परीक्षा उत्तीर्ण

ड्रेसर (१ जागा) - १०वी पास सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय ड्रेसिंगमधील प्रमाणपत्र (सीएमडी)

ड्रायव्हर (७ जागा) - १०वी पास आणि राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून वैध अवजड मोटार वाहन चालविण्याचा परवाना आणि हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (ज्यु. क्लार्क १४ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी वेग नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र.

आरोग्य पर्यवेक्षक (हेल्थ सुपरवायझर १ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी उत्तीर्ण आणि बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचार्‍यांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा

प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब असिस्टंट १ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त मंडळातून १२वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा.

लॅब परिचर (रुग्णालय) (लॅब अटेंडंट हॉस्पीटल १ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून 10वी परीक्षा उत्तीर्ण असावे.

लेजर लिपिक (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण आणि सरकार मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नसलेले टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र.

नर्सिंग ऑर्डरली (१ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून १०वी परीक्षा उत्तीर्ण

शिपाई (२ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून १०वी परीक्षा उत्तीर्ण

स्टोअर कुली (२ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून ७ वी परीक्षा उत्तीर्ण

चौकीदार (७ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (५ जागा) - एमबीबीएस पदवी
आया (२ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून ७ वी परीक्षा उत्तीर्ण
हायस्कूल शिक्षक (बी.एड.) (७ जागा) - पदवी सह संबंधित विषयात बी.एड.
फिटर (१ जागा) - शैक्षणिक पात्रता : १०वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर ट्रेड मध्ये आय.टी.आय
आरोग्य निरीक्षक (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी

कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी. टेक उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (३ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी. टेक उत्तीर्ण
लॅब टेक्निशियन (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा

मालिस (५ जागा) - १० वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून गार्डनरचा प्रमाणित अभ्यासक्रम
मजदूर (१० जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून ७ वी परीक्षा उत्तीर्ण
सफालकर्मचारी (६९ जागा) - कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून ७ वी परीक्षा उत्तीर्ण
स्टाफ नर्स (३ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी कोर्स (GNM) मध्ये बी.एस्सी उत्तीर्ण आणि नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया/राज्यात नोंदणी
ऑटो-मेकॅनिक (१ जागा) - १०वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक ट्रेड मध्ये आय.टी.आय
डी.एड शिक्षक (९ जागा) - संबंधित विषयात पदवीधर, कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून डी.एड. आणि TET / CTE मध्ये पात्र असणे आवश्यक

फायर ब्रिगेड लस्कर (३ जागा) - १ जागा कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण, तर २ जागा फायर फायटिंग कोर्स
हिंदी टायपिस्ट (१ जागा) - कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण
मेसन (१ जागा) - १० वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून दगडी बांधकाम ट्रेड मध्ये आय.टी.आय
पंप अटेंडंट (१ जागा) - १० वी परीक्षा उत्तीर्ण सह कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून पंप मेकॅनिक ट्रेड मध्ये आय.टी.आय

परीक्षा फी : ६००/- रुपये [इतर उमेदवार – ४००/- रुपये]
पगार : १५,०००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
र्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Office of the Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune 411001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : pune.cantt.gov.in