esakal | पुणे : पीएच.डी.प्रवेश परीक्षेला ९२ टक्के उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Phd students

पुणे : पीएच.डी.प्रवेश परीक्षेला ९२ टक्के उपस्थिती

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी (पेट) ९१.८१ टक्के विद्यार्थी उपस्थिती होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.८) घोषित करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.

पेटसाठी १५ हजार ५४८ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १४ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. विद्यापीठात पीएच.डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा म्हणजे पीएच.डी प्रवेशासाठी होणारी पेट परीक्षा. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दुसरा टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, त्यात प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. नेट, सेट आणि गेट परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेतून (पेट) सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांना पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबर मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. त्यासंबंधी संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागात गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण

कॉपीबहाद्दरांनो सावधान...

पेट परीक्षेतील ऑनलाइन गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाने प्रोक्टॅर्ड पद्धत वापरली होती. तरीही काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर परीक्षेतील प्रश्नांचे फोटोग्राफ फिरत असल्याचे पहायला मिळाले. प्रोक्टॅर्ड पद्धतीत मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास इशारा दिला जात होता. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होते. संबंधीत विद्यार्थ्यावर गैरप्रकार केल्याची कारवाई केली जाणार आहे.

‘पेट’मधील उपस्थिती..

विद्याशाखा : पात्र विद्यार्थ्यांची संख्या : उपस्थित विद्यार्थी

१) विज्ञान आणि तंत्रज्ञान : ७२८३ : ६७९१

२) वाणिज्य आणि व्यवस्थापन ; २८२८ : २६०३

३) मानव्यविज्ञान : ४२९० ; ३,८४५

४) आंतरविद्याशाखा ; ११४७ : १०३७

loading image
go to top