बँकेतली नोकरी सोडली आणि जग फिरू लागली; वाचा राजर्षिताची गोष्ट

त्यांना एखादे असे काम हवे होते जिथे ऑफीसमध्ये बसून राहावे लागणार नाही आणि कमाईसुद्धा चांगली होईल.
rajarshita
rajarshitagoogle

मुंबई : चांगल्या पगाराच्या बँकरची नोकरी कोणाला सोडायची आहे ? तथापि, जगात असे लोक आहेत ज्यांची स्वप्ने वेगळी आहेत. कोलकातामध्ये राहणाऱ्या राजर्षिता सुर यांचे जग भरण्याचे स्वप्न आहे. यासाठी त्यांनी बँकेतल्या नोकरीचीही पर्वा केली नाही. यात त्यांना Share Marketची खूप मदत झाली.

राजर्षिता यांना मुंबईच्या एका खासगी बँकेत नोकरी मिळाली होती. त्यामुळे हवे तेव्हा कुठेही फिरायला जाता यायचे नाही. त्यांना एखादे असे काम हवे होते जिथे ऑफीसमध्ये बसून राहावे लागणार नाही आणि कमाईसुद्धा चांगली होईल. त्या बँकेत Forex Tradingचे काम करत असल्याने त्यांनी शेअर बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला.

बँकेतली नोकरी सोडून राजर्षिता यांनी स्वतंत्रपणे शेअर बाजारात व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी एका खासगी कंपनीसोबत प्रॉपरायटरी इक्विटी ट्रेडर म्हणून काम केले. यासोबत त्यांनी स्वत:चा व्यवसायही सुरू ठेवला. हळूहळू राजर्षिता शेअर बाजारात सरावल्या आणि त्यांनी पुरेसा पैसा कमावला. मग त्यांनी ही नोकरीसुद्धा सोडली आणि जग फिरण्यास सुरुवात केली.

गेली ८ वर्षे शेअर बाजारात व्यवसाय करणाऱ्या राजर्षिता यांची ओळख इन्व्हेस्टमेंट गुरू अशी बनली आहे. त्यांनी आतापर्यंत आग्नेय आशिया आणि ७० टक्के युरोप पाहिला आहे. नुकतीच त्यांनी नेपाळची सहल पूर्ण केली आणि आता केनिया आणि आयर्लंड येथे जाणार आहेत. दरवर्षी राजर्षिता १० लाख रुपये फक्त सहलीसाठी बाजूला काढतात. दर महिन्याला ३ ते ४ टक्के नफा कमावण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते. ते पूर्ण झाले की राजर्षिता व्यवसाय बंद करतात आणि फिरायला जातात.

राजर्षिता म्हणतात की, शेअर बाजार हा एखाद्या झुगारापेक्षा कमी नाही. त्यांनी एकदा यात खूप पैसे गमावले होते. त्यातून धडा घेत त्यांनी आता दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com