क्लायमेट चेंज...! 

क्लायमेट चेंज...! 

लांबच्या प्रवासात गाडीचं टायर पंचर झाल्यास आपली हवा आधी फूस होते. इथून पुढं आपण वेळेत नवीन टायर घेणार बाबा! व्हील रोटेशन करणार! खड्ड्यातून सावकाश जाणार, स्टेपनीची हवा नियमित चेक करणार, अशा शपथा घेतो. पण पुढं जाऊन खूप मोठा घाट चढायचा आहे, गाडीची सर्व्हिसिंग केलेली नाही, चालक नवशिका आणि बेभान आहे याचा आपल्याला विसर पडतो, किंबहुना तो विचार आपण केलेलाच नसतो. 

सावधान, कोव्हिडरूपी खिळा सापडला आणि अर्थव्यवस्थेचं पंचर काढलं, तरी आणखी मोठा धोका पुढं आहे! 

काल वर्ल्ड अर्थ डे होता. ‘अर्थ’मध्ये जग आलंच, पण तरीही मराठीत याला जागतिक ‘earth day’ म्हणायचं असल्यास माझी काही हरकत नाही. हा दिवस म्हणजे पर्यावरण दिवसांसारखाच आहे. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या मिळमिळीत बाबींकडं आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे हा. या विषयाकडं सामान्य माणूस फार लक्ष देत नाही, कारण प्रदूषणापलीकडं हा विषय आपल्याला झेपत नाही. तसही याचे धोके कितीतरी दशकं दिसणार नाहीत हा गैरसमज आणि तसंही आपली लोकसंख्या इतकी आहे की, काही करता येणं अशक्यच आहे, ही धारणा. 

लोकसंख्या! उच्च आणि मध्यमवर्गीय लोकसंख्या म्हणताना स्वतःला त्यात धरत नाहीत. स्त्रियांचे शिक्षण, आर्थिक सबलीकरण, बालआरोग्य या दोन-चार प्रश्‍नांवर काम केलं, की लोकसंख्येचा प्रश्‍न सुटू शकतो हे आता सिद्ध झालेलं आहे. नुसते आकडे बघून अनेक वर्षांची धारणा आणि भूमिका बदलत नसते. ‘काही झालं तरी गरिबांची लोकसंख्या कमी व्हायला हवी, कारण गरीब कमी झाले म्हणजेच गरिबी कमी झाली. त्याबरोबर गुन्हे कमी होतील, दंगली कमी होतील,’ असा युक्तिवाद करून आपण आपल्या मूळ भूमिकेवर ठाम राहतो. 

क्लायमेट चेंजचही तसंच! 
सगळ्यात मोठा आणि दूरचा धोका क्लायमेट चेंज आणि सगळ्यात जवळचा धोका कोव्हिड 19. हे दोन्हीही उच्चमध्यमवर्गीय. बस, कार किंवा बाईक, पंख्याऐवजी एसी, दोनऐवजी तीन बीएचके, ट्रेनऐवजी प्लेन, सतत नवीन वस्तूंची खरेदी, त्या वस्तूंचं लग्न पोशाखाएवढं भरजरी पॅकिंग करून घरपोच येणं, त्या वस्तू थोड्या वापरून कचऱ्यात टाकणं, ओला-सुका कचरा एकत्र टाकणं, पाण्याची नासधूस, रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दलची उदासीनता... या सगळ्यामुळं जगबुडी येणार हे सिद्ध झालं आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com