esakal | 2357 च्या मेगा भरतीनंतर पोस्टात पुन्हा बंपर भरती; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही संधी
sakal

बोलून बातमी शोधा

India Post

सरकारी नोकरी शोधताय? मग, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

2357 च्या मेगा भरतीनंतर पोस्टात पुन्हा बंपर भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

India Post recruitment 2021 : सरकारी नोकरी शोधताय? मग, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता टपाल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून 2357 च्या मेगा भरतीनंतर पुन्हा 'भारतीय टपाल विभागा'कडून तेलंगणा सर्कलमधील (Telangana Circle) क्लर्क (Clerk) आणि पोस्टमन (Postman) यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण, 55 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. पोस्ट विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड या पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार असल्याचे पोस्ट अधिकाऱ्यांनी जाहिरातीव्दारे स्पष्ट केले आहे.

पोस्टात भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असून यासाठी पोस्ट विभागाच्या https://tsposts.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, आता पोस्टात 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून यासाठी जास्तीत-जास्त अर्ज करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया क्रीडा कोट्यांतर्गत केली जाणार आहे.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती

India Post recruitment 2021 : रिक्त जागा

  • पोस्टल असिस्टंट - 11 पदे

  • सॉर्टिंग असिस्टंट - 08 पदे

  • पोस्टमन - 26 पदे

  • एमटीएस - 10 पदे

हेही वाचा: Indian Post : पोस्टात 'या' पदांसाठी मोठी भरती

शैक्षणिक पात्रता : पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

'पोस्टमन' या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, शिवाय उमेदवारानं 10 वीच्या वर्गात तेलगू भाषेचा अभ्यास केलेला असावा. तसेच, तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा परवाना देखील गरजेचा आहे.

'एमटीएस' या पदाकरिता 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून उमेदवाराला तेलगू भाषा येणं गरजेचं आहे.

या पदांसाठी वयोमर्यादा : 18 ते 27 वयवर्षे असलेल्या ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, तर एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षे यात सूट देण्यात आलीय. त्याचबरोबर, एमटीएस पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

loading image
go to top