राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत जिल्हा रुग्णालयात उपचार सेवा देण्यात येतात. यातील अपवाद वगळता बहुतेक रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.
कोल्हापूर : वैद्यकीय उपचार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून (Department of Medical Education) मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Rajarshi Shahu Maharaj Government Medical College) चतुर्थ श्रेणी वर्गातील ९६ पदांवर भरती होणार आहे. ही भरतीची प्रक्रिया बाह्यस्त्रोत कंपनीकडून राबविण्यात येणार आहे.