ऑटोमेशन इंजिनिअरिंग : विस्तारणारे क्षेत्र

यांत्रिकीकरणानंतरची पायरी म्हणजे ऑटोमेशन म्हणता येईल
Rajesh Ohol writes  career in Automation Engineering
Rajesh Ohol writes career in Automation Engineeringsakal
Summary

यांत्रिकीकरणानंतरची पायरी म्हणजे ऑटोमेशन म्हणता येईल. फरक एवढाच, की ऑटोमेशनमध्ये मनुष्य बौद्धिक वापर आणि शारीरिक उपस्थिती अथवा कष्ट यांचा खूपच कमी प्रमाणात वापर होतो.

- राजेश ओहोळ

कार्यनिहाय यंत्रांचा शोध व त्यांचा वापर म्हणजे यांत्रिकीकरण होय. यंत्रांनी मनुष्याचे शारीरिक कष्ट कमी केले. यांत्रिकीकरणानंतरची पायरी म्हणजे ऑटोमेशन म्हणता येईल. फरक एवढाच, की ऑटोमेशनमध्ये मनुष्य बौद्धिक वापर आणि शारीरिक उपस्थिती अथवा कष्ट यांचा खूपच कमी प्रमाणात वापर होतो.

स्वयंचलित नियंत्रणप्रणालीचा उच्च शास्त्र-तंत्रज्ञान यंत्रणेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. नुसत्या उत्पादन क्षेत्राला ऑटोमेशनने प्रभावित केलेले नाही; तर दूरसंवाद, वैद्यकीय, वित्त, वाणिज्य, अंतरिक्ष वाहन, उपग्रह, क्षेपणास्त्र मार्गदर्शन, एरोनॉटिक्‍स, रोबो इत्यादींच्या प्रणालींमध्ये स्वयंचलित नियंत्रण हा अविभाज्य भाग ठरतो.

अभियांत्रिकी उत्पादन, प्रक्रिया यापासून ते गुणता आश्‍वासन या टप्प्यांमध्ये स्वयंचलित नियंत्रणाचा अधिकाधिक वापर आज सर्वत्र पाहावयास मिळतो. अभियांत्रिकीतील कठीण प्रक्रियांमध्ये मनुष्य सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता वस्तू उत्पादन दर व अंतिम वस्तूची गुणवत्ता वाढविण्यासाठी कंट्रोल इंजिनिअरिंगचा पर्याय म्हणजेच ऑटोमेशन. विविध प्रतिकूल व अनुकूल परिस्थितीशी मिळतेजुळते घेणारी शास्त्र-तंत्रज्ञानावर आधारित पूर्वनियोजित कार्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली म्हणजे ऑटोमेशन होय.

सुरुवातीच्या काळात अभियांत्रिकी उत्पादनप्रक्रिया किंवा प्रणाली ऑटोमेशन ही एक गुंतागुंतीची रचना होत. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल व इन्स्ट्रुमेंटेशन घटकांचा प्रामुख्याने समावेश होत असे. प्रोग्रॅमेबल कंट्रोलरचा शोध व वापराने ऑटोमेशन क्षेत्रामध्ये आमूलाग्र प्रगती झाली आहे. प्रोग्रॅमेबल कंट्रोलर हे कॉम्प्युटरसारखे बहुगुणी नाही; परंतु जेथे कॉम्प्युटरचा वापर अशक्‍य ठरतो अशा सर्व प्रतिकूल वातावरणात प्रोग्रॅमेबल कंट्रोलर पूर्वनियोजित कार्यासाठी विनाअडथळा काम करते.

नेहमीच्या पारंपरिक पद्धती/प्रक्रिया यांना पदार्थ निर्मितीतील अचूकता पातळी वाढविण्यास अटळ मर्यादांशी सामना करावा लागतो. अशा वेळी पदार्थाची विश्‍वासार्हता व अचूकता यांच्या पातळीत ऑटोमेशनने वाढ करता येते. पर्यावरण व आरोग्य निगडित क्षेत्रांमध्ये ऑटोमेशनच्या वापरामुळे प्रक्रिया उद्योगांतून बाहेर पडणारे पर्यावरण हानिकारक टाकाऊ घटक, विषारी वायू, रसायने इत्यादींची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते व पर्यावरणाचे रक्षण करता येते.

ऑटोमेशन उपकरणे ही ‘अंकिय नियंत्रण’ (Numeric Control) द्वारे कार्य करतात. आधुनिक मायक्रोकॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी, इंटरफेस व लॅंग्वेज यांच्यामुळे प्रोग्रॅमेबल कंट्रोलर संगणकासारखे चौकस कामांसाठी वापरण्यात येत आहेत. शास्त्र-तंत्रज्ञान संबंधित सर्व प्रकल्प, उद्योग, कारखाने, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय संशोधन व विकास संस्था यातील स्वयंचलित यंत्रणेमध्ये प्रोग्रॅमेबल कंट्रोलर महत्त्वाचा घटक ठरला आहे. सध्या विविध प्रकारांची ‘ऑटोमेशन टूल्स’ उद्योगांमध्ये वापरली जातात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे...

  • आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क (ANN)

  • डिस्ट्रिब्युटेड कंट्रोल सिस्टिम (DCS)

  • ह्यूमन मशिन इंटरफेस (HMI)

  • सुपरवायझरी कंट्रोल ॲण्ड डाटा ऍक्विझिशन (SCADA)

  • प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर (PLC)

  • प्रोग्रॅमेबल ऑटोमेशन कंट्रोलर (PAC)

  • रोबोटिक्‍स

  • इन्स्ट्रुमेंटेशन

  • मोशन कंट्रोलर

ऑटोमेशन सामान्यतः खालील मुद्द्यांवर व शर्थींवर अवलंबून राहते

  • उत्पादन/प्रक्रिया यांचा प्रकार किंवा स्वरूप

  • वस्तूची/पदार्थाची अपेक्षित उच्चतम अंतिम गुणवत्ता

  • वस्तूविकास कालावधी

  • अपेक्षित प्रक्रिया कार्यक्षमता वाढ

  • वस्तू डिझाईनमध्ये होणारे चालू व संभाव्य बदल

  • आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची आवश्‍यकता

अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, प्रॉडक्‍शन, इंडस्ट्रिअल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, केमिकल आदी शाखांचे पदवी/पदविका शैक्षणिक पात्रताधारक, तसेच भौतिकशास्त्र किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयातील बी.एस्सी./एम.एस्सी. उमेदवार ऑटोमेशन क्षेत्रात विशेष योग्यता मिळवू शकतात. ऑटोमेशनचा अभ्यासक्रम व प्रशिक्षण सरकारी किंवा खासगी संस्थांद्वारे मिळविता येते. फ्ल्यूड पॉवर व प्रोग्रॅमेबल कंट्रोलर यांच्या सयुक्तिक वापराने ऑटोमेशन इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे ऑटोमेशन ही सर्वच उद्योगांची जीवनरेषा बनली आहे. छोट्या उद्योगांपासून अवजड व मोठ्या उद्योगांमध्ये अशा अभियंत्रांचे योगदान मोलाचे ठरत आहे. ऑटोमेशन कन्सल्टन्सी व डिझाईन या सेवा व्यवसायाद्वारेही स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com