Employment
EmploymentSakal

करिअरच्या वाटेवर : कौशल्याधिष्ठित शिक्षण रोजगारास पात्र

देशाची आर्थिक प्रगती व सामाजिक विकास हे कौशल्ये आणि ज्ञान यावर अवलंबून राहते.
Summary

देशाची आर्थिक प्रगती व सामाजिक विकास हे कौशल्ये आणि ज्ञान यावर अवलंबून राहते.

- राजेश ओहोळ

देशाची आर्थिक प्रगती व सामाजिक विकास हे कौशल्ये आणि ज्ञान यावर अवलंबून राहते. ज्या देशाकडे कौशल्ये व ज्ञान या गोष्टी आहेत, ते देश रोजगारातील आव्हाने व संधी यांच्याशी प्रभावीपणे मिळते जुळते घेऊ शकतात. सर्व उमेदवारांना उच्चतम कौशल्ये व ज्ञान आणि देश-विदेशात मान्य असलेले शिक्षण देणे हे राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भविष्यातील चांगला रोजगार व जागतिक बाजारपेठेतील भारताची स्पर्धा लक्षात ठेऊन कौशल्य अधिष्ठित शिक्षण मिळविणे हे कधीही इष्ट ठरेल.

कुठलाही उद्योग, कंपनी अगर संस्था संबंधित उमेदवाराची त्यांना किती व काय उपयुक्तता आहे हे तपासून नोकरी देते. शिक्षणाच्या बहुसंख्य शाखांमध्ये नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञान व प्रणाली यांचा सातत्याने समावेश होत आहे. अशा अद्ययावत गोष्टींची पुरेपूर माहिती व त्यातील प्रशिक्षण ही एक काळाची गरज होऊ पाहत आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतीय कामगार अहवालानुसार भारतीय उद्योग क्षेत्रात रोजगार किंवा नोकरीची उपलब्धता पुष्कळ असली तरी निव्वळ कौशल्य अभावामुळे बहुसंख्य व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षणधारकांना त्यांच्या योग्यतेला शोभणारा किंवा लागू पडणारा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. सर्व क्षेत्रातील ९० टक्के रोजगार संधी या व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना उपलब्ध होतात. एवढे मोठे प्रमाण असूनही शाळा/महाविद्यालयातील शिक्षण हे पुस्तकापर्यंत मर्यादित राहिले आहे. वेगाने बदलणाऱ्या शास्त्र-तंत्रज्ञानानुसार उद्योगविश्व आपापल्या कार्यप्रणाली व संरचनेत जागतिक स्पर्धेत टिकण्याकरीता सातत्याने फेरबदल करत आहे. अशा नवनवीन गोष्टींचा शिक्षणामध्ये समावेश लगेच होत नसल्याने त्या-त्या संस्थांमध्ये विशेष रोजगार पूर्व प्रशिक्षण घेणे क्रमप्राप्त बनले आहे.

नवीन फेरबदलांना आयटी क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या सॉफ्टवेअर लॅग्वेज आज पूर्णत- कालबाह्य झालेल्या दिसतात. परिणामी, आयटी फिनिशिंग स्कूल यांचे कॉर्पोरेट जगात प्रमाण वाढलेले दिसते.

उत्पादन सेवा आणि व्यापार क्षेत्रातील विशेष व आताच्या मागण्यांनुसार यातील उद्योगांना उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती उद्योग व शिक्षण संस्था यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू झालेली दिसते. अशा प्रशिक्षणांमार्फत उमेदवारांना रोजगार हमी मिळत आहे. प्रशिक्षणांमार्फत उमेदवारांचे विशेष तांत्रिक कौशल्य, मनुष्य विकास आणि आचरण कौशल्य विकसित केले जते. विद्यापीठ पदवी/पदविका अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट नसलेल्या नेतृत्व व सादरीकरण कौशल्य तसेच भिन्न संस्कृतीतील संवाद कला आदी बाबींवर भर दिला जात आहे. अशा तऱ्हेने जागतिक दर्जाच्या उद्योगांमध्ये रोजगारास पात्र ठरविण्यासाठी नोकरभरती परिणामांनुसार सर्व शिक्षणधारकांना स्वत-ला सतत अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारतीय कामगार अहवालानुसार मनुष्यबळाची गरज वाढत आहे, हे निश्चित असले तरी प्रत्यक्षात शिक्षण व कौशल्य संपन्न उमेदवारांना थेट त्यांच्या शिक्षण शाखेला लागू होणारा रोजगार मिळणार आहे. तेव्हा पदवी/पदविका शिक्षणधारकांनी स्वत-चे शिक्षण, कल व क्षमता आदी बाबींचा विचार करून जागतिक रोजगार बाजारपेठेत रोजगारास पात्र व्हावे, असे वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com