करिअरच्या वाटेवर : पूरक अभियांत्रिकी शाखांचा पर्याय...

विशिष्ट प्रयोजनासाठी मूलभूत अभियांत्रिकी अधिष्ठित सहाय्यकारी किंवा पूरक अभियांत्रिकी शाखांची रचना करण्यात आली आहे.
Engineering
EngineeringSakal
Summary

विशिष्ट प्रयोजनासाठी मूलभूत अभियांत्रिकी अधिष्ठित सहाय्यकारी किंवा पूरक अभियांत्रिकी शाखांची रचना करण्यात आली आहे.

- राजेश ओहोळ

विशिष्ट प्रयोजनासाठी मूलभूत अभियांत्रिकी अधिष्ठित सहाय्यकारी किंवा पूरक अभियांत्रिकी शाखांची रचना करण्यात आली आहे. सहाय्यकारी किंवा पूरक अभियांत्रिकी शाखांचा पर्याय देखील शाखांचा प्राधान्यक्रम देताना विचारपूर्वक असणे गरजेचे आहे. अगदी मुख्य मूलभूत अभियांत्रिकी शाखा मिळाली नाही तर, या शाखेला सहाय्यकारी वा पूरक शाखा निवडण्यास हरकत नाही. रोजगार क्षेत्रात मूलभूत अभियांत्रिकी शाखा आणि सहाय्यकारी अभियांत्रिकी शाखा अशी विषमता नसते.

अगदी सोपे उदाहरण म्हणजे यूपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा घेता येईल. यूपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखांकरीता दरवर्षी होतात. या मुख्य शाखांव्यतिरिक्त त्या त्या शाखेला सहाय्यकारी अभियांत्रिकी शाखांचे उमेदवारही तेवढेच निवड पात्र आहेत तसेच, यूपीएससी व्यतिरिक्त केंद्र सरकारांच्या विभागनिहाय होणाऱ्या स्वतंत्र व थेट भरतीत सहाय्यकारी अभियांत्रिकी शाखांचे उमेदवार मूलभूत अभियांत्रिकी शाखांतील उमेदवारांसारखेच समपातळीवर समजले जातात. पूरक अभियांत्रिकी शाखांची ओळख या लेखाद्वारे करून देत आहे.

प्रॉडक्शन इंजिनिअरिंग

मेकॅनिकल इंजिनिअरिंग अधिष्ठित शाखा आहे. इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट डिझाईन, मार्केटिंग, फायनान्स आणि कॉर्पोरेट प्लॅनिंग यांची सांगड प्रॉडक्शन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात घातली आहे. उत्पादन क्षेत्रातील छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये प्रोसेस इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट डिझाईन आणि प्रॉडक्शन प्लॅनिंग ही जबाबदारी प्रॉडक्शन इंजिनिअरची असते. वस्तू किंवा पदार्थ यांचे उत्पादन ठरण्याकरिता प्रभावी आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर उत्पादन प्रक्रिया व तंत्रज्ञान यांचा वापर कसा होईल हे प्रॉडक्शन इंजिनिअरच्या ज्ञान व कौशल्य यावर अवलंबून राहते. अत्युच्च मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानामुळे वस्तूच्या उच्चतम गुणवत्तेची हमी देता येते. उद्योग स्वतःच्या उत्पादनात सातत्यपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी प्रॉडक्शन इंजिनिअरिंग विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीने अद्ययावत ठेवत आहे. त्याकरिता वस्तू संशोधन व विकास आणि उत्पादन यातील समन्वय घडवून आणण्याची वैशिष्ट्यता ही प्रॉडक्शन इंजिनिअरची असते. प्रामुख्याने उत्पादन उद्योगांमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअरची भूमिका निर्णायक आहे.

मरिन इंजिनिअरिंग

जहाजांचे तसेच सागरी वाहनांचे डिझाईन, बांधणी व संबंधित यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आदी मुख्य कार्ये मरिन इंजिनिअर करतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग अधिष्ठित शाखा आहे. इलेक्ट्रिकल, इलेट्रॉनिक्स, न्यूमॅटिक, हायड्रॉलिक, केमिस्ट्री, कंट्रोल इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर, प्रोसेस इंजिनिअरिंग, बॉयलर, गॅस टर्बाईन इत्यादी प्रमुख विषय मरिन इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात शिकवले जातात. भारतीय सशस्त्र सैनांच्या नौदल आणि तट तटरक्षक दल, सार्वजनिक जहाज बांधणी उद्योग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यामध्ये मरिन इंजिनिअरिंगचे उमेदवार करिअर करू शकता, तथापि बहुतांश मरिन इंजिनिअर मोठ्या पगाराच्या आकर्षणामुळे मर्चंट नेव्ही पर्यायाकडे वळतात.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग

या शाखेचे अत्यंत विस्तृत स्वरूप आहे. पॉवर इंस्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या इलेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आधारित शाखा आहेत. इलेट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा अँटोमेशन करीता सर्व क्षेत्रांमध्ये योगदान मोठे ठरत आहे. साहजिकच या शाखेतील अभियंत्याची अगदी संशोधन आणि विकास टप्पा ते गुणवत्ता नियंत्रण टप्प्यापर्यंत सर्व थरांमध्ये गरज अनिवार्य ठरली आहे. डिजिटल युगात या शाखेचे महत्त्व वाढत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने अवघड कार्ये ही अगदी अचूकरीत्या यशस्वी होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स ही शाखा सागरी तळातील संशोधन ते अंतरिक्ष संशोधन कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखांचे संयुक्त ज्ञान म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर डिझाइन आणि हार्डवेअर-सॉफ्टवेअर यांचे एकत्रीकरण आदी गोष्टी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचा अविभाज्य भाग आहे. मायक्रो प्रोसेसर, पर्सनल कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर ते सर्किट आदींचे डिझाइन कार्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची भूमिका आव्हानात्मक असते. एका कॉम्प्युटर सिस्टिमपासून ते अनेक कॉम्प्युटर सिस्टिम एकत्रितपणे कार्यान्वित करणे हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा भाग आहे. कॉम्प्युटरचा वापर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होत आहे. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणे सहाजिकच आहे. रोजगाराच्या विपुल संधी कॉम्प्युटर इंजिनिअरला आहेत.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आय. टी.)

इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर या मार्फत माहितीचे संकलन, संवर्धन, प्रक्रिया, प्रेक्षण, पुनर्जीवन, आदी गोष्टी आय.टी. इंजिनिअरिंगमध्ये मोडतात. आय.टी. शाखेचा तंत्रज्ञानाशी संबंध येतो तसेच माहिती व्यवस्थापन व प्रक्रिया ही या शाखेची खरी ओळख आहे. गेल्या दोन दशकांमध्ये आय.टी.ने उद्योग विश्वात मोठे स्थान मिळविले आहे. आय.टी. ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अधिष्ठित शाखा असल्याने तेवढीच रोजगाराभिमुख ठरली आहे. सीईटी गुणांधारे अगदी हवी असणारी शाखा ढोबळमानाने निवडू नये. हव्या असणाऱ्या अभियांत्रिकी शाखेला पूरक अभियांत्रिकी शाखेचा पर्याय केव्हाही उत्तमच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com