वाटा करिअरच्या... : सर्वंकष माहिती मिळवा...

राजीव बोस
Wednesday, 20 January 2021

परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये फक्त कोणते अभ्यासक्रम उपलब्ध असतात, एवढीच माहिती घेणे अपेक्षित नसून विख्यात विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत, याचीही माहिती हवी.

परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये फक्त कोणते अभ्यासक्रम उपलब्ध असतात, एवढीच माहिती घेणे अपेक्षित नसून विख्यात विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत, याचीही माहिती हवी. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळतेच; शिवाय त्याचा उपयोग करिअर योग्य पद्धतीने घडण्यासाठीही मोठ्या प्रमाणात होतो. कारण, विख्यात विद्यापीठातील प्रवेश नोकरीच्या बाजारपेठेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. दरम्यानच्या काळात तुम्ही पदवी अभ्यासक्रमात कशी कामगिरी करता, यालाही मोठे महत्त्व आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठीच्या आवश्यक पात्रतांचा अभ्यास करणे, ही पुढची महत्त्वाची पायरी ठरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक देशाच्या त्यांच्या देशात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही विशिष्ट अपेक्षा असतात. आपण विद्यार्थीकडून सर्वाधिक मागणी असलेल्या देशांचा विचार करू. भारतातील सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेमध्ये उच्चशिक्षणासाठी जातात. संशोधन क्षेत्राकडे पाहण्याचा पुरोगामी दृष्टिकोन व हुशार विद्यार्थ्यांना मोठी संधी देणारी बाजारपेठ यांमुळे विद्यार्थांची परदेशी शिक्षणातील पहिली पसंती अमेरिकेला असते. विद्यार्थांना अंडरग्रॅज्युएट (भारतीय व्यवस्थेनुसार महाविद्यालयीन शिक्षणानंतर)  किंवा ग्रॅज्युएट शिक्षणासाठी (भारतामध्ये पदवी संपादन केल्यानंतर) अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

भारतात बारावीच्या परीक्षेला किमान प्रथम श्रेणी मिळविलेला विद्यार्थी अमेरिकेत अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय ‘एसएटी’मधील चांगला स्कोअर व टॉफेलसारख्या इंग्रजी भाषेच्या चाचणीत मार्कांचाही इतर पात्रतांमध्ये समावेश होतो. ग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी, एसएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १६ वर्षांचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते.
(लेखक परदेशी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Bos Writes about career route