परदेशात शिकताना... : इकॉनॉमिक्स आणि फायनान्समधील संधी

जगभरात मान्यता मिळत असलेले आणखी एक क्षेत्र म्हणजे फायनान्स आणि इकॉनॉमिक्स. भारतात हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या थिअरीचे चांगले ज्ञान असते.
परदेशात शिकताना... : इकॉनॉमिक्स आणि फायनान्समधील संधी

जगभरात मान्यता मिळत असलेले आणखी एक क्षेत्र म्हणजे फायनान्स आणि इकॉनॉमिक्स. भारतात हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या थिअरीचे चांगले ज्ञान असते, मात्र या विषयातील अॅप्लिकेशनवर आधारित ज्ञानाला मोठी मागणी आहे. तंत्रज्ञानात झालेल्या मोठ्या प्रगतीनंतर हे क्षेत्र आता आणखी मोठ्या उंचीवर जाऊन पोचले असून, प्रेडिक्टिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स त्यात भरीव प्रगती झाली आहे व हे क्षेत्र अधिक स्पर्धात्मकही झाले आहे.

फायनान्स किंवा कॉम्प्युटिशनल मॅथेमॅटिक्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिशय उच्च दर्जाची क्वांटिटिटिव्ह अॅबिलिटी आणि खूप चांगली शैक्षणिक कारकीर्द गरजेची असते. तुमच्याकडे या क्षेत्रातील कामाचा विशेष अनुभव असल्यास अनेक मोठ्या संधींची द्वारे खुली होतात व या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये खूप मोठा पगारही मिळतो. यासाठी विद्यार्थ्यांने विज्ञान किंवा अभियांत्रिकीमधील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, मात्र या साठीची महत्त्वाची अट म्हणजे त्यांच्याकडे मॅथेमॅटिक्स व स्टॅस्टेस्टिक्स या विषयांमधील प्रावीण्य असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा जीपीए आणि जीआरईचा स्कोअर चांगला असेल, त्याच्या जोडीला सॉफ्टवेअरमधील नैपुण्यासह नोकरीचा अनुभव असेल, तर तुम्हाला अमेरिकेतील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकतो.

नजीकच्या काळात फायनान्स हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. बिग डेटाचे हे युग गुंतवणूकदारांसाठी अनेक फायद्याच्या गोष्टी घेऊन आले आहे. यामध्ये अद्ययावत ट्रेडिंग अल्गोरिदम आणि त्याचा परिणामकारक उपयोग मोठ्या प्रमाणावरील व्यवहार करताना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे गणिती तंत्र व माहितीचे पृथःकरण (डेटा अॅनालिसिस) यांचा वापर फायनान्स क्षेत्रातील महत्त्वाची दुवा बनला आहे. या बदलत्या परिस्थतीमध्ये अनेक विद्यार्थी फायनान्शिअल इंजिनिअरिंगसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात प्रवेश घेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर शेअर बाजाराचा प्रभाव वाढत असून, अनेक लोक बाजारात पैसा गुंतविण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे फायनान्शिअल अॅनालिस्ट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा आदर्श करिअर पर्याय म्हणून समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com