Scholarship : रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील विद्यार्थ्यांना मिळणार पावणेचार कोटींची शिष्यवृत्ती

डिसेंबर-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत ‘रयत’च्या दक्षिण विभागाने नेत्रदीपक यश मिळवून यंदाही वरचष्मा ठेवला आहे.
rayat shikshan sanstha student get 4 cr scholarship sangli education
rayat shikshan sanstha student get 4 cr scholarship sangli educationSakal

सांगली : शिक्षण क्षेत्राला गुणवत्तेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाने (सांगली) राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात ‘एनएमएमएस’ तसेच ‘सारथी’मध्ये लख्ख यश मिळवले. डिसेंबर-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत ‘रयत’च्या दक्षिण विभागाने नेत्रदीपक यश मिळवून यंदाही वरचष्मा ठेवला आहे.

तब्बल ९६९ विद्यार्थी राष्ट्रीय, तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या ५५ विद्यार्थ्यांसाठी २६ लाख ४० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ‘सारथी’साठी पात्र ठरलेल्या ९१४ विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांकरिता ३ कोटी ५० लाख ९७ हजार ६०० अशी एकूण ३ कोटी ७७ लाख ३७ हजार ६०० रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रेरणेतून व विद्यालयाच्या मार्गदर्शिका सरोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या दक्षिण विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,

ढवळी (ता. वाळवा) विद्यालयाने आठवीच्या ‘एनएमएमएस’ परीक्षेत भरारी घेतली असून विद्यालयाचे ७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ५४ विद्यार्थ्यांनी यश मिळाले. मयुरी पाटील, अनुष्का हाके यांच्यासह अन्य पाच विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले, तर ४१ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

रुकडी (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विद्यालयाने ‘एनएमएमएस’ परीक्षेत विद्यार्थी अभिलाष संजय कांबळे याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून त्याने १३८ गुण प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीत (राखीव संवर्गातून) १२ व्या स्थानी भरारी घेतली आहे.

१६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक ठरले. नेहरू विद्यालय, हिंगणगाव (बु.) विद्यालयातील अनुष्का माने, प्रथमेश कदम यांच्यासह २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या विद्यालयाची दीक्षिता मातोंडकर हिने सर्वसाधारण प्रवर्गातून तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावून बाजी मारली, तर मंथन परब हा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला.

सडोली खालसा शाखेने चमकदार कामगिरी करत ८२.६५ टक्के निकाल प्राप्त करून यशाला गवसणी घातली. हुपरी शाखेची विद्यार्थिनी काव्या राहुल मुद्राळे हिची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. दुधगाव शाखेतून वेदांत गुरव याने इतर मागास प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

शिरोळची पूर्वा मुडशिंगे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. आष्टा येथील निर्जरा सुदर्शन उपाध्ये हिने चमकदार कामगिरी करून जिल्हास्तरीय निवड यादीत स्थान मिळवले. सियात तांबोळी ग्रामीण भागातील खरसुंडी शाखेत शिकणारा विद्यार्थी जिल्ह्यात २० व्या स्थानी पोहेचला.

साखरपासारख्या दुर्गम भागातील ८५ शाखांतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, सहायक निरीक्षक ए. ए. डिसोझा, यू. बी. वाळवेकर, तसेच शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

संस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांची मेहनत, योग्य मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ‘प्रूव्हन स्ट्रॅटेजी’मुळे स्पर्धा परीक्षेत ‘रयत’मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानावर असलेल्या पहिल्या तीन विद्यालयांना वात्सल्य फाउंडेशनतर्फे हजारोंची बक्षिसे जाहीर केली आहेत.
- डॉ. एम. बी. शेख, विभागीय अध्यक्ष, दक्षिण विभाग, सांगली

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत संस्थेतील निष्ठावान शिक्षक विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना मनात ठेवून समतोल पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत. ‘रयत’मध्ये बहुगुणी विद्यार्थी घडतात, अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
- विनयकुमार हणशी, विभागीय अधिकारी, दक्षिण विभाग, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com