एज्युकेशन जॉब्स
RBI Recruitment 2025 : सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बॅंकेत कोणत्याही परीक्षेशिवाय मिळतेय नोकरी, आत्ताच करा अर्ज
RBI Recruitment : या आरबीआय भरतीसाठी या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या कोणालाही १४ फेब्रुवारी पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करता येईल. या भरतीद्वारे सल्लागाराची पदे भरली जातील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी, आरबीआयने वैद्यकीय सल्लागार (एमसी) पदांसाठी भरती जारी केली आहे. या पदांशी संबंधित पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. भरतीसाठी तुम्हाला rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.