esakal | बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'RCU' 'बी. प्लस'चा मानकरी
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'RCU' 'बी. प्लस'चा मानकरी

बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'RCU' 'बी. प्लस'चा मानकरी

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : दहा वर्षाच्या कालावधीत राणी चन्नम्मा विद्यापीठाला (आरसीयु) यंदा पहिल्यांदाच नॅक कमिटीने भेट दिली होती. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान त्यांनी विद्यापीठातील शैक्षणिक उपक्रमांचा अभ्यास केला. या आधारावर विद्यापीठाला बी. प्लस हे मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा: बेळगाव : ५ दिवसांच्या गणशोत्सवाला मंडळांचा आक्षेप

सदरचे मानांकन पाच वर्षापर्यंत असणार आहे. या संबंधीची माहिती नॅक कमिटीने विद्यापीठाला ई-मेलच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ७) दिली. यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मानांकनाच्या आधारावर यानंतर विद्यापीठाला निधी मिळणार आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी महाविद्यालये यापूर्वी कर्नाटक विद्यापीठ धारवाडला (केयुडी) सलग्नित होती. मात्र, दहा वर्षापूर्वी भुतरामहट्टी या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा: बेळगाव : रुंदीकरणाला विरोध नाही, शेतकऱ्यांचे नुकसान नको

गेल्या दहा वर्षात नॅक कमिटीने एकदाही भेट दिली नव्हती. मात्र, यंदा १ ते ३ सप्टेंबर या दरम्याने भेट देऊन पाहणी केली. नॅक कमिटीत युजीसीचे अधिकारी असतात. विद्यापीठात तीन अधिकारी आले होते. तर दोन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यानिमित्त विभागात पुस्तक प्रदर्शन तसेच इतर शैक्षणिक उपक्रम आयोजित केले होते. काही विभागांनी आपली माहिती मांडली होती. विद्यापीठाची इमारत, शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता आदी आधारावर हे मानांकन दिले गेले आहे. यापूर्वी विद्यापीठात राज्यस्तरीय कमिटीने मानांकन दिले आहे. मात्र, आता नॅकचे मानांकन मिळाले असल्यामुळे विद्यापीठाचा दर्जाही वाढला आहे.

loading image
go to top