Post Office Recruitment 2023: १०वी उत्तीर्णांना टपाल विभागात नोकरीची संधी; असा करा अर्ज

अर्ज करणारे उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच हलके व जड वाहन चालवण्याचा परवानाही असावा.
India Post Office Recruitment 2023
India Post Office Recruitment 2023google

मुंबई : भारतीय टपाल विभागामार्फत वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा कार्यालयात भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या चेन्नईमध्ये केल्या जातील. उमेदवारांना इंडिया पोस्ट तामिळनाडूच्या सर्कलमध्ये अर्ज करावा लागेल.

निवडलेल्या उमेदवारांना ७व्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. यासोबतच निवड झालेल्या उमेदवारांना इतर अनेक भत्तेही दिले जातील. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती... (recruitment in india post job for 10th passers driver job)

India Post Office Recruitment 2023
UPSC Job : पदवीधरांसाठी मोठी संधी; यूपीएससीमध्ये होत आहे भरती

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच हलके व जड वाहन चालवण्याचा परवानाही असावा. अधिक तपशील अधिसूचनेत पाहावा.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि गुणवत्तेच्या आधारावर पोस्टल विभागाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली अधिसूचना तपासू शकतात.

India Post Office Recruitment 2023
Bank Job : स्टेट बँकेत ८६८ पदांवर भरती; लेखी परीक्षेशिवाय होणार उमेदवारांची निवड

टपाल विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे.

  • यानंतर, वरिष्ठ व्यवस्थापक भरती आणि ड्रायव्हर भरती लिंकवर क्लिक करावे.

  • फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.

  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com