esakal | ‘अलबत्या-गलबत्या’ची भारतीय टपाल विभागानं घेतली दखल
sakal

बोलून बातमी शोधा

‘अलबत्या-गलबत्या’ची भारतीय टपाल विभागानं घेतली दखल

‘अलबत्या-गलबत्या’ची भारतीय टपाल विभागानं घेतली दखल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे ‘नॅशनल पोस्टल वीक’ येत्या ११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात नाट्यक्षेत्रात विश्वविक्रम घडवणाऱ्या ‘अलबत्या-गलबत्या’ या बालनाट्याची दखल भारतीय टपाल विभागानं घेतली आहे. जागतिक टपालदिनी या नाटकात चेटकिणीची भूमिका साकरणारे अभिनेते वैभव मांगले आणि निर्माते राहुल भंडारे यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट जाहीर करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्यातील चेटकिणीची भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले यांनी अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना चेटकिणीच्या प्रेमात पाडले आहे. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडल्या आहेत. तर गेली १५ ते १६ वर्षे व्यावसायिक नाट्य क्षेत्रात एक यशस्वी निर्माता म्हणून राहुल भंडारे काम करत आहेत. नाट्य क्षेत्रात कोणताही कौटुंबिक वारसा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली केली. या रंगभूमीला त्यांनी निरनिराळे आशय, विषय आणि चौकटीबाहेरच्या कलाकृती दिल्या आहेत.

नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नसून लोकांच्या विचारात सकारात्मक बदल घडवण्याचे एक माध्यम होऊ शकते यावर ठाम विश्वास दाखवत, ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम नगर मोहोल्ला’, ‘ठष्ट’, ‘बॉम्बे १७’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ यांसारख्या धाडसी आणि सामाजिक भान निर्माण करणाऱे विषय त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणले. या दोन्ही कलावंतांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय टपाल विभागातर्फे त्यांना तिकिटाच्या रूपानं कौतुकाची थाप देण्यात येणार आहे.

हेही वाचा: आर्यन खानला मिळणार जामीन?

हेही वाचा: Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

loading image
go to top