
पंजाब-नॅशनल बँकेत नोकरीची संधी; ७ मे अंतिम तारीख
मुंबई : पंजाब-नॅशनल बँकेने १४५ पदांसाठी भरती सुरू केली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे आहे. https://www.pnbindia.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. (Punjab National Bank Recruitment)
हेही वाचा: पंजाब नॅशनल बॅंकेचा नफा 507 कोटींवर
अर्ज स्वीकारण्याची सुरूवात २२ एप्रिल झाली होती. ७ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. १२ जूनला ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मॅनेजरची (रिस्क) ४० पदे, मॅनेजरची (क्रेडीट)ची १०० पदे आणि वरिष्ठ व्यवस्थापकाची ५ पदे रिक्त आहेत.
हेही वाचा: पंजाब नॅशनल बॅंकेत खाते आहे? जाणून घ्या PNB चे नवे नियम
२५ ते ३५ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती-जमाती आणि अपंग यांच्यासाठी ५० रुपये अर्ज शुल्क आहे. इतरांसाठी हे शुल्क ८५० आहे. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
१२ एप्रिल १८९५ रोजी पंजाब-नॅशनल बँकेची स्थापना झाली. आतापर्यंत या बँकेत ९ बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. देशभरात या बँकेच्या १० हजार ५२८ शाखा आहेत. २ आंतरराष्ट्रीय शाखा, १३ हजार ५०६ एटीएम, १२ हजार ४७८ व्यवसाय प्रतिनिधी आहेत. पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची public sector bank आहे.
Web Title: Recruitment In Punjab National Bank
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..