esakal | "सीआरपीएफ'च्या सहाय्यक कमांडंट पदांसाठी भरती सुरू !
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF

"सीआरपीएफ'च्या सहाय्यक कमांडंट पदांसाठी भरती सुरू !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

CRPF Recruitment 2021 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये पगार देण्यात येणार आहे.

सोलापूर : केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाने (Central Reserve Police Force) (CRPF) सहाय्यक कमांडंटच्या (सिव्हिल / अभियंता) विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. 25 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविली जात आहे. माजी सैनिकही या पदांसाठी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 10 टक्के जागा आरक्षित आहेत. (Recruitment is underway for the post of Assistant Commandant of CRPF-ssd73)

हेही वाचा: अकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून करता येणार अर्ज

इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती, दोन नवीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, तसेच दोन लिफाफ्यात आवश्‍यक कागदपत्रांसह हाताने किंवा पोस्टद्वारे अर्ज भरणे आवश्‍यक आहे. छायाचित्र न मिळाल्यास अर्ज नामंजूर केला जाईल.

भरलेला अर्जाचा फॉर्म फक्त 29 जुलै 2021 पर्यंत डीआयजी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, रामपूर, जिल्हा - रामपूर, यूपी -41 या पत्त्यावर पाठवावा. लिफाफ्याच्या वरच्या बाजूला, "केंद्रीय राखीव पोलिस दल सहायक कमांडंट (अभियंता / नागरी) परीक्षा, 2021' लिहिणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: स्थानिक कोरोना स्थितीमुळे आयटीआय सुरू करण्यास प्रशासनाचा नकार!

सीआरपीएफ भरती 2021 परीक्षा शुल्क

अनारक्षित / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. अनुसूचित जाती / जमातीमधील उमेदवार आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

CRPF Recruitment 2021 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल. वेतनश्रेणी आणि वयोमर्यादेबद्दल पूर्ण माहितीसाठी उमेदवार अधिकृत सूचना पाहू शकतात.

loading image
go to top