स्थानिक कोरोना स्थितीमुळे आयटीआय सुरू करण्यास प्रशासनाचा नकार!

स्थानिक कोरोना स्थितीमुळे आयटीआय सुरू करण्यास प्रशासनाचा नकार!
ITI
ITIGoogle

जिल्ह्यातील "आयटीआय' सुरू करण्याबाबत काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. कोरोनाची लाट ओसरल्याने शासनाच्या वतीने त्याबाबत प्रयत्नही सुरू होते.

सोलापूर : जिल्ह्यातील "आयटीआय' (ITI) सुरू करण्याबाबत काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. कोरोनाची (Covid-19) लाट ओसरल्याने शासनाच्या वतीने त्याबाबत प्रयत्नही सुरू होते. "आयटीआय'चे प्रशिक्षण हे पूर्णपणे प्रात्यक्षिकावर अवलंबून आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही. प्रात्यक्षिके नियमित घेणे "आयटीआय'च्या शिक्षणात अत्यावश्‍यक बाब आहे. मात्र "आयटीआय'चे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने (Department of Skill Development and Entrepreneurship) आदेश दिल्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून जिल्हा व महापालिका प्रशासनाने या प्रकारची कोणतीही संमती देण्यास नकार दर्शविला आहे. (The administration refused to start the ITI due to the local corona condition-ssd73)

ITI
विमानसेवेचा स्पिन ऑफ इफेक्‍ट! जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले विकासाचे नियोजन

शहरातील शासकीय आयटीआयमध्ये एकूण 25 ट्रेड आहेत. तसेच हा "आयटीआय' तीन शिफ्टमध्ये चालतो. एकूण 65 बॅचद्वारे एकूण दीड हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. कोरोना काळात या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे दुर्बल आर्थिक घटकातील आहेत. अनेक विद्यार्थी इतरवेळी काही रोजगाराची कामे करून हे शिक्षण घेत आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, "आयटीआय'च्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे "आयटीआय' सुरू करण्याच्या आदेशाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. तेव्हा ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. तसेच सोलापूर जिल्हा हा कोरोना स्थितीच्या बाबतीत तिसऱ्या टप्प्यातच आहे. त्यामुळे "आयटीआय'चे प्रशिक्षण सुरू करता येणार नाही. यासोबत विद्यार्थ्यांना सोलापुरात वसतिगृहात ठेवले तरी कोरोना नियमांचे पालन करता येणार नाही, असेही लक्षात आले. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनाच्या परवानगी अभावी "आयटीआय' सुरू करता येणार नाही, असे मानले जाते.

ITI
जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट !

आम्ही स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) आदेशाशिवाय याप्रकारची परवानगी मिळणार नाही, ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आम्ही "आयटीआय' बंदच ठेवण्याचा निर्णय सध्यातरी घेतला आहे.

- एम. एम. बीडकर, उपप्राचार्य, शासकीय आयटीआय, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com