esakal | NPCIL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 20 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

NPCIL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 20 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज

न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

NPCIL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 20 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (Nuclear Power Corporation of India Limited - NPCIL) ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार NPCIL ची अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अधिसूचना तपासू शकतात व अर्ज करू शकतात. एनपीसीआयएलच्या अधिसूचनेनुसार, ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 75 पदांची भरती केली जाईल. यापैकी फिटरसाठी 20 आणि ट्यूनरसाठी 4 जागा रिक्त आहेत. तसेच मशिनिस्ट, इलेक्‍ट्रिशियन आणि वेल्डरसाठी अनुक्रमे 2, 30 व 4 पदांची भरती केली जाईल.

हेही वाचा: PhD प्रवेशासाठी 'के. सेट' विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष; 'RCU' पुन्हा चर्चेत

याशिवाय 9 इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक, 4 ड्राफ्ट्‌समन (सिव्हिल) आणि 2 सर्व्हेअर पदींची भरती होईल. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की या पदांसाठी किमान वय 14 वर्षे असावे आणि या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 24 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी उमेदवार आयटीआय डिप्लोमा इन फिटर असावा. याशिवाय, मशिनिस्ट, वेल्डरसह इतर ट्रेडमध्ये संबंधित डिप्लोमा असावा. या व्यतिरिक्त, शैक्षणिक पात्रता किंवा भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

हेही वाचा: IBPS मध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह apprenticeshipindia.org द्वारे सादर करावा. उमेदवारांनी नमूद केलेल्या वेब पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी apprenticeshipindia.org या वेबसाइटवर अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी केली आहे त्यांनी संबंधित ट्रेडसाठी एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर E01212900046 वापरून न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, Kaiga साइटची स्थापना करावी लागेल, या NPCIL वेबसाइटवर 15 ऑक्‍टोबर 2021 रोजी दुपारी 4 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. अर्ज करताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण, फॉर्ममध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास अर्ज रिजेक्‍ट होऊ शकतो.

loading image
go to top