esakal | 'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 243 पदांसाठी अर्ज मागविले केले आहेत.

'ECIL'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited - ECIL), भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत (Department of Atomic Energy, Government of India) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 243 पदांसाठी अर्ज मागविले केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या जाहिरात क्रमांक 29/2021 नुसार, 243 आयटीआय अप्रेंटिस (ITI Apprentice) विविध ट्रेडमध्ये भरती पक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती अप्रेंटिसशिप ऍक्‍ट 1961 नुसार केली जाईल आणि अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्ष असेल, जो ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: रेल्वेमध्ये दहावी व आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी!

असा करा अर्ज

इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ITI अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. तथापि, उमेदवारांना कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी भारत सरकारच्या apprenticeship portal, apprenticeshipindia.org वर नोंदणी करावी लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली आहे आणि उमेदवार 16 सप्टेंबर 2021 च्या सायंकाळी 4 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करावी आणि त्यांच्या अर्जाचा अनुक्रमांक देखील नोंदवावा.

हेही वाचा: ICAI ने सीए फाउंडेशन व अंतिम परीक्षा निकालाची केली तारीख घोषित

जाणून घ्या पात्रता

इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ITI अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (ITI) कडून संबंधित ट्रेडमध्ये NCVT प्रमाणपत्र घेतलेले असावे. तसेच, 14 ऑक्‍टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वय 28 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 30 वर्षे आहे.

loading image
go to top