अभियंत्यांना 'भेल'मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHEL

अभियंत्यांना 'भेल'मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत ईलेक्ट्रीकल्स लिमिटेड (BHEL)मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. bel-india.in या संकेतस्थळावर १ जूनपर्यंत अर्ज करता येईल. अभियंत्यांसाठी ही पदे भरली जात आहेत.

एकूण ५० पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यापैकी ३८ पदे प्रशिक्षणार्थी अभियंता आणि उर्वरित पदे प्रकल्प अभियंता आणि अधिकारी पदांसाठी आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंत्यासाठी वयोमर्यादी ३८ वर्षे आहे. प्रकल्प अभियंता आणि अधिकारी पदांसाठी ३२ वर्षे वयोमर्यादा आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी अर्ज शुल्क १७७ रुपये तर प्रकल्प अभियंत्यासाठी ४७२ रुपये आहे.

अर्ज कसा कराल ?

सर्वात आधी bel-india.in या संकेतस्थळाला भेट द्या.

त्यानंतर संकेतस्थळावर दिलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा.

आता अप्लायवर क्लिक करा.

अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा.

अर्ज शुल्क अदा करा.

प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जाची प्रिंट घ्या.