10वी, 12वी उत्तीर्णांसाठी संधी; भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती| Indian Army Recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Recruitment

10वी, 12वी उत्तीर्णांसाठी संधी; भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती

भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात गट सी पदांसाठी भरती सुरू आहे. आर्टिलरी देवलाली आणि आर्टिलरी रेकॉर्ड नाशिकने लिपीक, सुतार, कुक, बार्बर, लस्कर, एमटीएस, वॉशरमन, दुरुस्ती अशा विविध पदांसाठी १०७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२२ आहे.

पदांची माहिती

 • एलडीसी - २७

 • मॉडेल मेकर - १

 • सुतार - २

 • कुक - २

 • रेंज लस्कर - ८

 • फायरमन - १

 • आर्टी लस्कर - ७

 • नाई - २

 • वॉशरमन - ३

 • एमटीएस गार्डनर - २

 • एमटीएस वॉचमन - १०

 • एमटीएस मेसेंजर - ९

 • एमटीएस सफाईवाला - १

 • सायस - १

 • एमटीएस लास्कर - 6

 • उपकरणे दुरुस्त करणारे - १

 • एमटीएस - २०

पदांमध्ये आरक्षण

 • अनारक्षित - ५२

 • एससी - ८

 • एसटी - ७

 • ओबीसी - २४

 • ईडब्लूएस - १६

 • पीएचपी - ६

 • ईएसएस - १८

 • एसएसपी - ३

हेही वाचा: सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

शैक्षणिक पात्रता - एलडीसीच्या पदांसाठी बारावी पास आणि टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे.

एमटीएस पदांसाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.

इतर सर्व पदांमध्ये काहींसाठी फक्त दहावी पास तर काहींसाठी दहावी उत्तीर्ण व्यतिरिक्त अनुभव मागितला आहे.

वय श्रेणी

 • सामान्य श्रेणीसाठी - १८ ते २५ वर्षे

 • एसी आणि एसटीसाठी - १८ ते ३० वर्षे

 • ओबीसीसाठी - १८ ते २८ वर्षे

अर्ज कसा करायचा

इच्छुक उमेदवारांनी कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, पिन - ४२२१०२ या पत्त्यावर पाठवावा. अर्जाच्या पाकिटावर पदाचे नाव आणि श्रेणी लिहिणे आवश्यक आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. लेखी परीक्षेत ०.२५ टक्के गुणांचे नकारात्मक गुण असतील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top