स्काउट-गाइड कोट्यांतर्गत रेल्वेमध्ये लेव्हल 1 अन्‌ 2 पदांची भरती!

स्काउट-गाइड कोट्यांतर्गत मध्य रेल्वेमध्ये लेव्हल 1 अन्‌ 2 पदांची निघाली भरती!
Central Railway
Central Railwayesakal
Summary

मध्य रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने स्तर 1 आणि 2 पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

सोलापूर : मध्य रेल्वे (Central Railway), रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Railway Recruitment Cell) स्तर 1 आणि 2 पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार RRC च्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 6 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. या भरती (Recruitment) प्रक्रियेतून 12 पदे भरली जाणार आहेत. 2021-22 या वर्षासाठी स्काऊट- गाईड (Scout-Guide) कोट्याअंतर्गत मुंबई (Mumbai), भुसावळ (Bhusawal), नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि सोलापूर (Solapur) विभागासाठी स्तर 1 आणि 2 ची पदे भरली जातील.

Central Railway
BSFने जारी केली कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना! 92 हजार वेतन

जाणून घ्या पात्रता...

  • स्तर 1 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. किंवा ITI प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

  • स्तर 2 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. दुसरीकडे, SC / ST / सैनिकांच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुणांची सूट आहे. याशिवाय, तांत्रिक पदासाठी, एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त अप्रेंटिसशिप ऍक्‍ट किंवा ITI प्रमाणपत्र असावे. तर उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

Central Railway
नॅशनल हाउसिंग बॅंकेत निघाली डेप्युटी व रिजनल मॅनेजर पदांची भरती!

हे आहे अर्जाचे शुल्क

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC / ST / PWD व महिला उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com