esakal | Jobs: दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेकॅनिक व कारपेंटर पदांची भरती! दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी संधी
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे

रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून चांगली संधी चालून आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेकॅनिक व कारपेंटर पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून (South Central Railway) चांगली संधी चालून आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे भरती 2021-22 ने एसी मेकॅनिक (AC Mechanic) आणि कारपेंटर (Carpenter) यांच्यासह 4,103 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबादच्या वेबसाईट scr.indianrailways.gov.in वर जाऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करा. आता जाणून घेऊया भरतीशी संबंधित माहिती.

हेही वाचा: JEE Advanced चा निकाल होणार 15 ऑक्‍टोबरला जाहीर! तपासा 'या' वेबसाइटवर

एसी मेकॅनिक आणि कारपेंटर यांच्या 4,103 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 4 ऑक्‍टोबर रोजी सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य /ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्जाचे शुल्क असून, SC / ST / सैनिक उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगद्वारे अर्जाचे शुल्क भरण्याची सुविधा दिली आहे.

वयोमर्यादा...

सामान्य उमेदवारांसाठी किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. एससी / एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली आहे.

हेही वाचा: अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी थेट भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

जाणून घ्या पात्रता...

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. यासह सीव्हीटी / एससीव्हीटी द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून अधिसूचित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना वाचून घ्या. जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्ही स्वतः एसी मेकॅनिक, कारपेंटर या पदांसाठी पात्र असाल तर ऑनलाइन अर्ज करा.

loading image
go to top