esakal | BEL मध्ये प्रोजेक्‍ट अन्‌ ट्रेनी इंजिनिअर्सची भरती ! 27 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

BEL मध्ये प्रोजेक्‍ट अन्‌ ट्रेनी इंजिनिअर्सची भरती !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

BEL Recruitment : भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (Bharat Electronics Limited - BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) आणि प्रकल्प अभियंता (Project Engineer) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. BEL ने आपल्या पंचकुला युनिटसाठी ही भरती आयोजित केली आहे. या रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात असतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी BEL च्या अधिकृत वेबसाइट www.belindia.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्‍टोबर आहे.

हेही वाचा: आईच्या पाठिंब्यामुळे महावीर झेंडगेंची दरवर्षी नवीन पदाला गवसणी!

BEL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 55 पदांची भरती केली जाईल. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता- I च्या एकूण 33 पदांची भरती केली जाईल. त्याचबरोबर प्रकल्प अभियंता- I च्या 22 पदांवर भरती केली जाईल. प्रकल्प अभियंता पदासाठी 500 रुपये आणि प्रशिक्षणार्थी अभियंत्यासाठी 200 रुपये अर्जाचे शुल्क असेल. तर पीडब्ल्यूडी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांनो, अर्ज करण्यासाठी प्रथम BEL च्या अधिकृत वेबसाइट www.belindia.in ला भेट द्या. त्यानंतर मेन पेजवरील करिअर टॅबवर क्‍लिक करा. आता अधिसूचनेसाठी अर्जाच्या लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा. आता अर्ज भरा. त्यानंतर अर्ज फी भरा. यासह, भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे ठेवा.

हेही वाचा: सात राज्यांतील 40 टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत डिजिटल डिव्हाईस!

प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षे असावे. त्याचबरोबर प्रकल्प अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी व कोणत्याही तांत्रिक सहाय्यासाठी उमेदवार cbtexamhelpdesk@gmail.com वर ई-मेल करू शकतात तसेच हेल्प डेस्क क्रमांक : 8866678549 / 8866678559 वर संपर्क साधू शकतात.

loading image
go to top