esakal | INCOIS मध्ये शास्त्रज्ञ व प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ पदांची भरती! अर्जासाठी उद्या शेवटची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

INCOIS मध्ये शास्त्रज्ञ व प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ पदांची भरती!

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

INCOIS मध्ये शास्त्रज्ञ व प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (Indian National Center for Ocean Information Services - INCOIS) ने विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्‍ट सायंटिफिक असिस्टंटच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. (Jobs) या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार INCOIS ची अधिकृत वेबसाइट incois.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया चालू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर आहे.

हेही वाचा: शाळा सुरू करा! मुंबईतील 67 टक्के पालक तयार : सर्व्हे

INCOIS भरती मोहिमेद्वारे एकूण 82 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यापैकी 7 पदे प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III च्या पदासाठी आणि 15 पदे प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II च्या पदासाठी आहेत. याशिवाय 40 प्रकल्प शास्त्रज्ञांच्या पदांवर नेमणुका केल्या जातील. तर 5 सहाय्यक प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ II च्या पदासाठी आणि 15 जागा प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक I च्या पदासाठी आहेत.

ही आहे वयोमर्यादा

  • प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III च्या पदासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

  • प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II च्या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

  • प्रोजेक्‍ट सायंटिस्ट I आणि प्रोजेक्‍ट सायंटिस्ट असिस्टंट II या पदासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

  • प्रोजेक्‍ट सायंटिस्ट असिस्टंट I या पदासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट I या पदांसाठी उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. तर उमेदवारांची लेखी परीक्षेद्वारे प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक II आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक I या पदांसाठी निवड केली जाईल.

हेही वाचा: प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले CA परीक्षेत यश

असा करा ऑनलाइन अर्ज

प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी INCOIS च्या अधिकृत वेबसाइट incois.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर मेन पेजवरील "व्हॅकेन्सी' टॅबवर क्‍लिक करा. त्यानंतर जाहिरात क्र. INCOIS/RMT/03/2021 वर क्‍लिक करा. आता आपली नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा. त्यानंतर सर्व आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करा. नंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवा.

loading image
go to top