Jobs : प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी UPSC ने जारी केली अधिसूचना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC
प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी UPSC ने जारी केली अधिसूचना!

प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी UPSC ने जारी केली अधिसूचना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC) ने विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सिनिअर असिस्टंट कंट्रोलर या पदांच्या भरतीसाठी 13 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

हेही वाचा: 'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा, कारण शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. यासोबतच अर्जातील कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास किंवा ती खोटी असल्याचे आढळून आल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. अधिकृत अधिसूचना वाचून अर्जदार विविध पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

  • प्रोफेसर इलेक्‍ट्रिकल अभियांत्रिकी : 1 पद

  • सहयोगी प्राध्यापक इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि दूरसंचार अभियांत्रिकी : 3 पदे

  • सहाय्यक प्राध्यापक संगणक अभियंता : 7 पदे

  • जॉइंट असिस्टंट डायरेक्‍टर - 3 पदे

  • उपसंचालक : 6 पदे

  • इंडियन ब्युरो ऑफ माइन्समध्ये वरिष्ठ सहाय्यक खाण नियंत्रक : 8 पदे

हेही वाचा: पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !

ही असेल अर्जाची फी

फॅकल्टी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त 25 रुपये फी भरावी लागेल. SBI च्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा SBI च्या नेट बॅंकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा / मास्टर क्रेडिट / डेबिट कार्ड वापरून पैसे पाठवून शुल्क जमा केले जाऊ शकते. SC / ST / PWBD / कोणत्याही समुदायाच्या महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. या व्यतिरिक्त उमेदवार UPSC भरती संबंधित अधिक तपशिलासाठी अधिकृत साइट तपासू शकतात.

loading image
go to top