esakal | Jobs : FSSAI मध्ये टेक्‍निकल ऑफिसर व हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती! 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

FSSAI मध्ये टेक्‍निकल ऑफिसर व हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती!

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

FSSAI मध्ये टेक्‍निकल ऑफिसर व हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India - FSSAI) ने विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. FSSAI ने अन्न विश्‍लेषक, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक IT, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक आणि इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांवर भरतीसाठी (Recruitment) अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. 13 ऑक्‍टोबर 2021 पासून उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

हेही वाचा: भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!

'या' तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 13 ऑक्‍टोबर, 2021

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख : 12 नोव्हेंबर 2021

  • पात्रता आणि पात्रता निकषांसाठी कटऑफ तारीख : 12 नोव्हेंबर 2021

एफएसएसएआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अन्न विश्‍लेषक पदासाठी एक आणि तांत्रिक अधिकाऱ्याच्या 125 जागा असतील. त्याचबरोबर केंद्रीय अन्न अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक आयटी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक आणि हिंदी अनुवादक या पदांसाठी अनुक्रमे 37, 4, 4, 33, 1 पदांची भरती केली जाईल. याशिवाय पर्सनल असिस्टंटची 19 पदे आणि आयटी असिस्टंटची 3 पदे भरती केली जातील.

हेही वाचा: Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

हिंदी अनुवादक आणि इतर पदांसाठी अर्ज कसा करा ऑनलाइन अर्ज

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट fssai.gov.in ला भेट द्यावी. आता वेबसाइटवरील "जॉब्स' टॅबवर क्‍लिक करा. एक नवीन विंडो उघडेल. आता परिपत्रक क्रमांक- HR-12013/6/2021-HR-FSSAI [DR-04/2021] वर जा आणि "ऑनलाइन अर्ज करा'वर क्‍लिक करा. 13 ऑक्‍टोबर 2021 पासून ही लिंक सक्रिय केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना आवश्‍यक तपशिलांसह अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST, Ex-service man, PWD, EWS उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

loading image
go to top