CBSE Office : सीबीएसईचे प्रादेशिक कार्यालय आता दुबईमध्ये

सीबीएसईचे दुबईमधील प्रादेशिक कार्यालय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार.
CBSE
CBSEsakal

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दुबईमध्ये नवीन प्रादेशिक कार्यालय आणि सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सीबीएसईचे दुबईमधील प्रादेशिक कार्यालय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे.

यासंदर्भातील संलग्न समितीच्या ९ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. सीबीएसईच्या नियामक मंडळाने १४ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीतही प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर मंडळाच्या नियंत्रण प्राधिकरण, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या परवानगीने दुबईमध्ये प्रादेशिक कार्यालय आणि सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्यात येत असल्याची माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

दुबईमधील प्रादेशिक कार्यालय हे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. हे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यानंतर दुबईमधील सीबीएसईचे सेंटर फॉर एक्सलन्स कार्यान्वित होईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com