esakal | मतदार यादीत युवकांची टक्केवारी वाढविण्याची गरज : मुख्य निवडणूक अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule Pune University approved 31 new colleges

मतदार यादीत युवकांची टक्केवारी वाढविण्याची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आज लोकसंख्येत १८ ते १९ वयातील युवा साडेतीन टक्के असले तरी प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये केवळ एक टक्का युवक नोंदणी आहे. तसेच १९ ते ३० वय असलेल्या युवकांची संख्या लोकसंख्येप्रमाणे १८ टक्के आहे, मात्र मतदार नोंदणीत केवळ १३ टक्के युवक आहेत. त्यामुळे पुढील काळात युवकांचा मतदार यादीतील टक्का वाढविण्याबरोबर त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.’’ असे मत प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्‍या वतीने शिक्षण दिनानिमित्त ‘लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन एस उमराणी, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक दिनानिमित्त डॉ. श्रुती तांबे, डॉ. राजेश्वरी देशपांडे आणि डॉ. सुहास पळशीकर या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

देशपांडे म्हणाले, ‘‘लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, मतदान जनजागृती हे महत्त्वाचे विषय असून यात ही अनेक समस्या आहेत. तर भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी व युवकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात त्याविषयी साक्षरता निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ, विविध स्पर्धा, प्रश्नोत्तरे, लोकशाही गप्पा, मतदार नोंदणी कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.’’

हेही वाचा: कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत पुरग्रस्ताचा जलसमाधीचा प्रयत्न

डॉ. माने म्हणाले, ‘‘सजग नागरिक म्हणून लोकशाहीची व्यवस्था पाहिली तर जाती, धर्माच्या आधारावर काही वर्तुळे तयार होत आहेत. भांडवलशाही, सरंजामशाहीमुळे लोकशाहीचा गळा घोटला जातोय की काय ? अशा प्रकारचे वातावरण संपूर्ण देशात निर्माण झाले आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जपायची असेल तर अनेक गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार घडावे, नागरिकत्व निर्माण व्हावे आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा त्यांना मिळावी अशा प्रकारची शिक्षण प्रणाली राबविणे गरजेचे आहे.’’

मतदान करणे, राजकीय व्यवस्था निर्माण करणे, उमेदवारांची निवड केवळ हीच लोकशाही नाही. तर सर्व वैविध्याचा मनापासून स्वीकार करणे म्हणजे लोकशाही. लोकशाहीच्या अंगाने देशाच्या भविष्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची, चर्चा आणि प्रशिक्षणाची गरज आहे. असे डॉ. उमराणी यांनी सांगितले.

हेही वाचा: शासनाच्या प्रस्तावावर विचार करुन पुढचा निर्णय घेऊ- राजू शेट्टी

कार्यक्रमाची प्रस्ताविक विषेश कार्य अधिकारी आणि स्वीप निमंत्रित सल्लागार डॉ. दीपक पवार यांनी केली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर, साधना गोरे यांनी आभार मानले.

‘‘लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. या मूल्यांची रुजवण शिक्षकच करू शकतात. विद्यापीठामध्ये लोकशाही, संविधान या विषयावर अभ्यासक्रम आहेत. तर, आगामी काळात लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निश्चितच असे कार्यक्रम सर्व विद्यापीठात होतील.’’

- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top