SSC-HSC Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी होणार जाहीर

परीक्षेच्या काळात २० ते २८ जुलै दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता
results of 10th and 12th supplementary exam will be declared tomorrow by the state board pune marathi news
results of 10th and 12th supplementary exam will be declared tomorrow by the state board pune marathi newsesakal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.२८) दुपारी एक वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध होतील आणि त्या माहितीची छायांकित प्रत (प्रिंट आउट) घेता येणार आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती.

परीक्षेच्या काळात २० ते २८ जुलै दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार शासनाने शाळांना सुटी जाहीर केली होती.

त्यातून संपूर्ण राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीच्या विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी आणि दहावीच्या विषयाची परीक्षा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तसेच २८ जुलै रोजी असलेल्या दहावीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची  गुणपडताळणी,

उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट २०२३ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन:श्च फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणारी अंतिम परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

www.mahresult.nic.in

गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संकेतस्थळ

दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in

बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी कालावधी : २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com