esakal | रेल्वे परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; 'असा' तपासू शकता Result I Railway Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

RRB NTPC Result
रेल्वे भरती बोर्ड लवकरच RRB NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याचं कळतंय.

रेल्वे परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; 'असा' तपासू शकता Result

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

RRB NTPC Result 2021 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच RRB NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याचं कळतंय. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिलीय, ते त्यांचा निकाल RRB च्या अधिकृत वेबसाइटवर www.rrbcdg.gov.in पाहू शकतात. आरआरबीची ही परीक्षा (NTPC CBT 1) 28 डिसेंबर ते 31 जुलै दरम्यान घेण्यात आली. आरटीबीनं एनटीपीसी परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु या महिन्यातच निकाल घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

निकाल कसा तपासायचा?

  • प्रथम RRB च्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.

  • आता मुख्यपेजवर 'NTPC CBT 1 Result 2020' या पर्यायावर क्लिक करा.

  • येथे विचारलेले आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

  • त्यानंतर 'सबमिट'वर क्लिक करा.

  • आता तुमचा RRB NTPC CBR-1 निकाल दिसेल.

  • तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

हेही वाचा: TCS मध्ये बंपर भरतीनंतर आता 35 हजार पदवीधरांना मिळणार नोकरी

रिक्त पदांचा तपशील

भारतीय रेल्वेनं 3 प्रकारच्या रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. यात NTPC साठी 35,208 (गार्ड, ऑफिस लिपिक, व्यावसायिक लिपिक इत्यादी), 1663 जागा आयसोलेटेड आणि मिनिस्ट्रियल श्रेणीसाठी (स्टेनो आणि शिक्षक) आणि 1,03,769 जागा लेव्हल 1 साठी (ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन) असणार आहेत.

हेही वाचा: FCI मध्ये 860 जागांसाठी बंपर भरती; 8 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

एकूणच, RRB ने NTPC श्रेणी, स्तर -1 पदांसाठी आणि विविध श्रेणींसाठी अशा 1.40 लाख रिक्त जागा अधिसूचित केल्या होत्या. बोर्डानं या आठवड्यात NTPC च्या इतर पदांतर्गत 35,281 रिक्त पदांची भरती केलीय. यात लिपिक कम टंकलेखक, लेखा लिपिक कम टंकलेखक, टाइम कीपर, ट्रेन लिपिक, कमर्शियल कम तिकीट लिपिक, वाहतूक सहाय्यक, गुड्स गार्ड, व्यावसायिक प्रशिक्षणार्थी, स्टेशन मास्टर इत्यादींचा समावेश आहे.

loading image
go to top