esakal | राज्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३२ हजार जागा रिक्तच
sakal

बोलून बातमी शोधा

RTE School

राज्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३२ हजार जागा रिक्तच

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आतापर्यंत 64 हजार 574 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहे. नागपूर विभागात 8 हजार 44 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले. राज्यात 32 हजार 110 तर नागपूर विभागात 2 हजार 679 जागा अद्यापही रिक्त आहेत‌.

राज्यातील 9 हजार 432 शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली. या शाळांमध्ये 96 हजार 684 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. नागपूर विभागात 1 हजार 309 शाळा नोंदणी केली आहे. यात 10 हजार 723 जागा उपलब्ध आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी काढलेल्या लॉटरीत 82 हजार 129 बालकांचा समावेश झाला होता. यातील 61 हजार 532 जणांचे शाळांमध्ये प्रत्यक्षात प्रवेश झाले आहेत.

हेही वाचा: पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

दुसऱ्या टप्प्यात प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया गत महिन्यापासून सुरू झाली. प्रतीक्षा यादीतून 10 हजार 197 बालकांची निवड झाली. यातील 2 हजार 760 बालकांचे तात्पुरते प्रवेश झाले आहेत. तसेच केवळ 3040 बालकांचे प्रवेश शाळा मध्ये निश्चित झाले‌. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाउनमुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेची संपर्क करावा आणि ऑनलाइनद्वारे बालकांच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुदतीनंतर प्रतीक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

  • शाळा/जागा/आलेले अर्ज/निवड/ तात्पुरते प्रवेश/निश्चित प्रवेश

नागपूर विभाग

भंडारा/94/791/2051/784/616/616

चंद्रपूर/196/1571/3082/1541/960/1133

गडचिरोली/76/624/706/494/247/417

गोंदिया/147/897/2380/854/680/684

नागपूर/680/5729/24169/5611/4271/4318

वर्धा/116/1129/3305/1116/669/876

  • नागपूर विभाग एकूण

1309/10723/35693/10400/7443/8044

loading image
go to top